गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमेरिकेत हजारो नोकऱ्या जाताय; भारतातही मंदी येणार? अर्थतज्ज्ञ काय म्हणताय?

by Gautam Sancheti
जानेवारी 8, 2023 | 5:03 am
in संमिश्र वार्ता
0
share market down e1673107398159

 

नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मंदी म्हटल्यावर धस्स व्हावं, अशी अवस्था आहे. २००८ मध्ये आयटीच्या क्षेत्रात आलेल्या मंदीने कित्येकांना रस्त्यावर आणलेले आपण बघितले. त्यानंतर कोरोनाच्या नावाने अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. पण आता कोरोनाच्या धक्क्यातूनच अद्याप सावरलेले नसताना पुन्हा एकदा मंदिचे सावट घोंघावू लागले आहे. या मंदीतही लाखोंच्या नोकऱ्या जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

२०२३ मध्ये मंदीची शक्य जगभरातील तज्ज्ञांनी वर्तवलीच होती. मुळात काही महिन्यांपूर्वी आयटीमध्ये आलेल्या मंदिने अनेकांच्या नोकऱ्याही घेतल्या. पण, २०२२ मध्ये वाढलेली महागाई याचे संकेत देतच होती. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी २०२३ हे आर्थिक मंदिचे वर्ष असेल, असे म्हटलेच होते. त्यानंतर त्याचे परिणाम आपण बघितले. अमेझॉन, मेटा आणि ट्विटरसारख्या बड्या कंपन्यांनी कित्येकांना नोकरीवरून काढले. चीनमध्ये कोरोनाची पुन्हा एकदा एन्ट्री होणे, महागाई वाढणे, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध या सर्व कारणांमुळे पुन्हा एकदा २००८ सारखीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारताबद्दल आशावादी
क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी जगभरात मंदी असली तरीही भारतात मात्र चांगले चित्र असेल, असे म्हटले होते. त्यांनी भारत संपूर्ण जगावर प्रभाव पाडेल आणि डिजीटायजेशनच्या दिशेने उत्तम पावलं उचलली जातील, असेही त्या म्हणाल्या होत्या. पण, दुर्दैवाने अमेरिकेतून आलेली मंदी सर्वांत पहिले भारतावर आक्रमण करते. आणि भारतातील मल्टीनॅशनल कंपन्या असो किंवा स्थानिक उद्योग असो, मंदीच्या नावावर भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमवाव्या लागतात, हे वास्तव आहे.

कोणी काय केले?
फेसबूकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने १३ टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या काळात फूड डिलीव्हरीमध्ये अव्वल कामगिरी करून मालामाल झालेली कंपनी आता अचानक तोट्यात गेली. त्यामुळे या कंपनीने दीड हजार कर्मचाऱ्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. अमेरिकेतील एएमसी केबल नेटवर्क या कंपनीने २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले.

Global Recession America Lay Off India Possibility

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तेव्हा तुमच्या लक्षात येईल

Next Post

हे आहेत राज्यातील ९ जैन तीर्थक्षेत्र; राज्यपालांच्या हस्ते सर्कीटचे लोकार्पण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed

हे आहेत राज्यातील ९ जैन तीर्थक्षेत्र; राज्यपालांच्या हस्ते सर्कीटचे लोकार्पण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011