नाशिक – नाशिक जिल्ह्यातील गिरणारे येथील रहिवासी साहेबराव उर्फ उद्धव अशोक बत्तासे वय वर्ष ३५ यांनी बुधवारी शेती कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. चार वर्षापूर्वी युको बँक गिरणारे येथून सहा लाख रुपये शेतीसाठी कर्ज घेतले होते पण शेतीमध्ये चार वर्ष मेहनत घेऊन देखील उत्पन्न न झाल्यामुळे त्यांनी बँकेचा एकही हप्ता न भरू शकले या कारणामुळे त्यांनी शेवटी आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे गावालगत धोंडेगाव या ठिकाणी त्यांची शेती होती साहेबराव बत्तासे हे गिरणारे येथून धोंडेगाव येथे शेती करायला जात असत मागील काही दिवसांमध्ये त्यांनी शेतीमध्ये पीक घेऊन उत्पन्न मिळेल या आशेने चार वर्षे शेती करून देखील शेवटी त्यांच्या हाती अपयश लागले. या कारणामुळे शेतात विष प्राशन करून साहेबराव बत्तासे यांनी शेती कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने गिरणारे आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साहेबराव बत्तासे यांचे वय अवघे ३५ होते या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर शेती व्यवसायाकडे आणि शेतीव्यवसायात पाय टाकणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत दुर्दैवी मानली जाते गिरणारे गावचे रहिवासी असलेले साहेबराव बत्तासे यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी आणि दोन लहान मुली आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती व्यवसायात साहेबराव बत्तासे यांनी अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न हा प्रयत्नच राहून त्यांना त्यांच्या पदरी अपयशच येत राहिले साहेबराव यांचे वडील लहानपणीच वारले आहेत यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी या दोन भावंडांवर पडली होती. याच बरोबर शेती व्यवसाय हा डबघाईला येत असताना कधीतरी निसर्ग वातावरणातील बदल पिकाला हमीभाव नसल्याने उत्पन्न मिळत नव्हते.
शेती करत असताना देखील कोरोना सारखे महाभयंकर संकट आणि यामध्ये भरडला जाणारा तो शेतकरी आणि होत असलेल्या या शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण ? असा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे.
शेतकरी आत्महत्या वाढत असल्या तरी कृषी विधेयके शेतकऱ्याला हमीभाव हे प्रश्न सरकारच्या दरबारात प्रलंबित असून शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहण्यास निवडणुकीनंतर कोणीही येत नाही. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात तीन पक्षाचे ठाकरे सरकार हे शेतकऱ्यांचे प्रश्नांवर गंभीर दिसत नाही हेच या युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या नंतर समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कधी थांबणार आणि पिकाला हमीभाव याच बरोबर शेतकरी हा जगाचा पोशिंदा जरी असला तरी त्याला आत्महत्या सोडून कोणताही पर्याय समोर उरलेला नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या चा पर्याय वापरून साहेबराव बत्तासे यांसारख्या युवा शेतकऱ्यांना आपले जीवन संपवावे लागत आहे. सरकारने साहेबराव बत्तासे यांच्या आत्महत्या कडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा आणि वाऱ्यावर पडलेल्या कुटुंबाचा विचार करावा असा त्यांच्या सोबतच्या सहकारी आणि मित्र परिवाराकडून सरकारदरबारी बत्तासे कुटुंबावर आलेल्या दुःखाच्या परिस्थितीत त्यांना धीर द्यावा अशा अपेक्षा वर्तवल्या जात आहे.