रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – सीएनजी भरण्यासाठी रात्री लागतात पंपावर रांगा, वाहनधारक त्रस्त

by India Darpan
जुलै 10, 2021 | 8:13 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210710 125630 scaled e1625904582513

नाशिक / दिंडोरी : पेट्रोल डिझेलचे सातत्याने भाव वाढत असल्याने अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनास पसंती देत वाहनांमध्ये सीएनजी किट बसवले मात्र पेट्रोल पाठोपाठ सीएनजीचे ही भाव वाढल्याने अन अपुऱ्या सीएनजी पुरवठ्याने  वाहन धारक त्रस्त झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी जास्तीत जास्त सीएनजी पंप सुरू करून २४ तास गॅस पुरवठा करण्याची मागणी  केली आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी,पळसे,ओझर ,चांदोरी,दोडी,पिंपळगाव,वडाळी भोई तर शहरातील जेलरोड बिटको व पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंप सुरू झाले आहे. मात्र या सर्व ठिकाणी अपुरा सीएनजी पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून होत असून रात्री पासूनच वाहनांची रांग लावावी लागत असून. सकाळी १० पर्यंत गॅस संपून जात आहे. पुणे ,मुंबई गुजरातमधून दररोज शेकडो वाहने येत असून जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सीएनजी गाड्या वाढत आहे. बाहेरील वाहनधारक रात्रीच लाईनला गाड्या लावत तिथेच झोपत आहे. स्थानिक वाहनधारक सकाळी गॅस भरण्यास गेले असता मोठी लाईन लागलेली असते व त्यांना गॅस मिळत नाही. .जिल्ह्यातील अनेक पंपावर सीएनजीचे काम झाले आहे. मात्र ते अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे सुरू करण्यात आलेले नसून काहींचे संथ गतीने काम सुरू आहे. लाईन मध्ये गाडी चालू बंद करत मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाया जात असून आता सीएनजीचे भाव दोन तीन रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे ज्यांनी पेट्रोल गाडीला महागडे सीएनजी किट बसवून त्यांना पस्तावा करावा लागत असून आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची अवस्था झाली आहे.
ढकांबे,दिंडोरी तील पंप लवकर सुरू करावे
दिंडोरी वणी परिसरात अनेक वाहने सीएनजी वरील आहे तसेच गुजरात मधून दररोज शेकडो वाहने येतात मात्र नाशिक कळवण सापुतारा रस्त्यावर पंप नसल्याने वाहनधारक यांची गैरसोय होत आहे.
ढकांबे येथील सीएनजी पंपाचे काम पूर्ण होऊन सहा सात महिने झाले. मात्र अद्याप तो सुरू झालेला नाही. दिंडोरीतही श्री स्वामी समर्थ पंपाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र लॅाकडाऊनमुळे ते संथ गतीने सुरू आहे. तरी दोन्ही पंप लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
सहनशीलतेचा अंत पाहू नये

सीएनजी साठी नागरिक मध्यरात्री पासून रांगा लावून असतात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडे वारंवार मागणी करून अधिक पंप सुरू केले जात नाही की पुरवठा वाढवला जात नाही. लोकांना रांगेत उभे करत  सदर कंपनीचे अधिकारी जनतेची मजाक करत असून वाहनधारकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

सुरेश खंबाईत, नाशिक
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – गिरणारे गावातील शेतक-याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

Next Post

युपीएससी परिक्षेसाठी संकेतस्थळावर नाशिक पर्याय उपलब्ध, परिक्षा केंद्राच्या निवडीसाठी अधिसूचना जाहीर

Next Post
upsc

युपीएससी परिक्षेसाठी संकेतस्थळावर नाशिक पर्याय उपलब्ध, परिक्षा केंद्राच्या निवडीसाठी अधिसूचना जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011