अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणातील पाणी साठा ९० टक्क्यांवर आल्या नंतर चणकापूर धरणातून पाण्याची आवक कमी झाल्यामुळे धारण काही दरवाजे बंद करण्यात येऊन केवळ २ दरवाजे १ फुटाने उघडे ठेवण्यात आले होते मात्र गेल्या २ दिवसा पासून चणकापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पुन्हा गिरणा नदीला पाणी वाढल्याने आज दुपारी गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे,धरणातील १ व ६ नंबरचे दरवाजे २ फुटाने व चार दरवाजे १ फुटाने उघडण्यात आल्याने नदी गिरणा नदी पात्रात 9504 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.