घोटी – नाशिक येथील अॅड. किर्ती जाधव यांची अखिल भारतीय बंजारा महिला सेनाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी दिले आहे. दरम्यान नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, बंजारा समाजाच्या हितासाठी जिल्हयातील तालुके गावे या ठिकाणी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे. यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन विमुक्त जाती भटक्या जातीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना पांडे, करसण राठोड, कल्पना पवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, जी, जी, चव्हाण आदीनी केले.