इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गौतम अदानी यांच्या कंपनीने आणखी एक मोठी डील केली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या अदानी समूहाची बंदर कंपनीने इंडियन ऑइलटँकिंग लिमिटेडमधील ४९.३८ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यापोटी अदानींनी १०५० कोटी रुपये मोजले आहेत. इंडियन ऑइलटँकिंग (IOTL) ही लिक्विड स्टोरेज सुविधा विकसित आणि ऑपरेट करणारी कंपनी आहे.
अदानी पोर्ट्सने एका निवेदनात म्हटले आहे की, या डीलमध्ये IOTL एनर्जी सर्व्हिसेस लि. यामध्ये अतिरिक्त १० टक्के इक्विटी स्टेकचा समावेश आहे. या उपकंपनीमध्ये IOTL ची ७१.५७ टक्के हिस्सेदारी आहे. निवेदनानुसार, “एपीएसईझेडने इंडियन ऑइलटँकिंगमध्ये ऑइलटँकिंग GmbH च्या ४९.३८ टक्के इक्विटी स्टेकच्या अधिग्रहणासाठी करार केला आहे. लिक्विड स्टोरेज सुविधांचा विस्तार आणि संचालन करणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी युनिट आहे.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, IOTL हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जर्मनीच्या ऑइलटँकिंग GmbH मधील संयुक्त उपक्रम आहे. निवेदनानुसार, गेल्या २६ वर्षांत, IOTL ने क्रूड आणि तयार पेट्रोलियमच्या साठवणुकीसाठी पाच राज्यांमध्ये सहा टर्मिनल्सचे नेटवर्क तयार केले आहे.
Gautam Adani Big Deal Buy New Company