इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करतो आहे. ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे तो पुनरागमन करणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे तर चांगलेच वाद रंगले होते. असे जरी असले तरी हा चित्रपट, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आणि यातील गाणी चांगलीच चर्चेत आहेत.
शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ काहीच दिवसात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. या चित्रपटामुळे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चर्चेत आहेत. अगदी तशीच शाहरुखची पत्नी गौरी खान सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’, ‘झुमे जो पठाण’ ही गाणी सध्या गाजत आहेत. गौरीला यातील कोणते गाणे आवडले आहे हे तिने पोस्टमधून जाहीर केले आहे.
https://twitter.com/gaurikhan/status/1612688991748517888?s=20&t=auoW22_2RUPslzCFUa6IQg
पठाणचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर अवघ्या काही तासांमध्ये लाखो लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे. ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर यावरुन बराच वाद रंगला. दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली. या रंगामुळे चित्रपटावर बहिष्कार घालायची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होते आहे. याच चित्रपटातील दुसरे गाणे ‘झुमे जो पठाण’ हे देखील चर्चेत आहे. गौरीने ‘झूम जो पठान’ या ब्रँडची पोस्ट शेअर केली आहे. “कामावर माझे आवडते गाणे ऐकायचे थांबवू शकत नाही” अशी कॅप्शनही त्याला दिली आहे.
‘पठाण’ला भगव्या बिकिनीच्या वादाचा फटका बसणार असं मध्यंतरी बोललं जात होतं. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता हे ‘पठाण’ सुपरहिट ठरणार असं प्रेक्षक म्हणत आहेत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यात मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. एका बाजूला बॉयकॉटचे संकट तर दुसऱ्या बाजूला ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Gauri Khan Reaction on Pathaan Movie Besharam Song