बंगळुरू – दक्षिण कन्नडा जिल्ह्यात एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कदायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. के. एस. शरत शेट्टी, मारुती मंजूनाथ, लॉज सतीश, इदयात उल्ला अशी आरोपींची नावे असून त्यांना शनिवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनीशी आरोपी शरत शेट्टीची फेसबुकवर ओळख झाली होती. आरोपी शेट्टी तिच्याशी सतत फोमवर बोलायचा. शेट्टीने तिची ओळख त्याचा नातेवाईक मंजुनाथशी करू दिली होती. मंजूनाथने पीडित मुलीला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवले आणि व्हिडिओ कॉलही केले. ओरपी शेट्टीने पीडितेला भेटायला बोलावले आणि एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा मित्र इदयात उल्लाने तिच्यावर बलात्कार केला. आरोपी सतीशने लॉजची व्यवस्था केली होती. तिघांनी मिळून पीडितेवर अत्याचार केला.
पीडितेच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी शाळेत जात असताना बंतवाल येथील बसस्टॉपजवळ आरोपी आला. त्याने मुलीला चॉकलेट दिले. चॉकलेट बॅगमध्ये ठेवेपर्यंत ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर ती अंथरुणावर होती. त्यानंतर आरोपींनी एक-एक करून दृष्कृत्य केले. त्यानंतर ती पुन्हा बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेव्हा ती कारमध्ये होते. आरोपीने तिला पुन्हा बसस्टॉपवर सोडले. त्यानंतर पीडितेन आईला घटनेची माहिती दिली.