व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… सांगलीचा चोर गणेश

India Darpan by India Darpan
September 21, 2023 | 5:31 am
in इतर
0

गणेशोत्सव विशेष…
तुज नमो…
सांगलीचा चोर गणेश

गणेशाची विविध रूपे, अवतार आपणास ज्ञात आहेत. दगडूशेठ, एकदंत, पंचमुखी, दशभुजा, त्रिशुंडी, धुंडीविनायक अशा अनेक नावांनी गणपती परिचित आहे. पण, सांगलीतील प्रसिध्द गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टच्या गणेशोत्सवात ‘चोर गणपती’ चे अनोखे रूप आपणास पहावयास मिळते. चोर गणपती म्हणताच आपण अचंबित झालात ना… हे कसले रूप.. ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपणाकडे शुभकार्यास सुरूवात होत नाही, तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल… हे कोडे न उलगडणारे आहे…

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

“सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला बाई आवडे भरजरी शेला” असे सांगलीच्या गणपतीबद्दल म्हटले जाते. सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी या देवस्थानची स्थापना केली. ते जेव्हा सांगलीत आले तेव्हा सांगली केवळ पाच हजार वस्तीचे लहान खेडेगाव होते. या शहरास राजधानीचे रूप देण्याचा संकल्प करून त्यांनी गणेशदुर्ग किल्ला आणि गणपती मंदिर उभारले. समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे.

सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.

इतिहास
श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थानची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. मात्र हे सर्व गणेशाचे आहे; आपण केवळ मुखत्यार आहोत अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे मंदिराचे बांधकाम होईतोपर्यंत मंदिराजवळील वाड्यातच त्यांचा मुक्काम राहिला. संस्थानकाळात सन. १८११ ला मंदिरच्या बांधकामास प्रारंभ झाला. मंदिरासमोरील भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर मंदिरांची बनावट काळ्या दगडातील आहे. मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा मागविण्यात आला. जोतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला. बांधकाम पूर्णं झाल्यावर १८४४ साली पाचही मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बांधकाम पूर्णं होण्यास जवळजवळ तीस वर्षांचा कालावधी लागला.

सन १८१४ च्या सुमारास पाया घातला. सुमारे ३० वर्षे काम सुरू होते. १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला.अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती भीमाण्णा आणि मुकुंदा पाथरवट यांसारख्या स्थानिक कारागिरांकडून बनविण्यात आल्या. सन १८४७ मध्ये शिखर पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिन्यात सुवर्णकलशारोहण झाले. हा कार्यक्रम मोठ्या समारंभाने करण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध नवमी छ. ७ मोहरम शके १७६९ म्हणजेच १६ डिसेंबर १८४७ रोजी कलशारोहण झाले. संस्थान काळातच श्री. गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली.

वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या पुढील संगमरवरी कमान मात्र स्वातंत्र्यपूर्व दशकात बांधण्यात आली. या कमानीमुळे मंदिराचे सौंदर्य उठून दिसू लागले. या कमानीचा दर्शनी तांबडा दगड संगमरवरी असून आतील दगड काळा पत्थर आहे. त्यासाठी जयसिंगपूरच्या खाणीतून दगड आणण्यात आला. संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे आहेत.

दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव होतो. हा उत्सव खूपच प्रसिद्ध आहे. सध्या मंदिर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखालील श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराच्या सुशोभीकरणासह सर्व व्यवस्था सांभाळली जाते. दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

संस्थानचा गणेशोत्सव
गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच ‘चोर’ गणपती बसतात. गणेशाची विविध रूपे, अवतार आपणास ज्ञात आहेत. दगडूशेठ, एकदंत, पंचमुखी, दशभुजा, त्रिशुंडी, धुंडीविनायक अशा अनेक नावांनी गणपती परिचित आहे. पण, सांगलीतील प्रसिध्द गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टच्या गणेशोत्सवात ‘चोर गणपती’ चे अनोखे रूप आपणास पहावयास मिळते. चोर गणपती म्हणताच आपण अचंबित झालात ना… हे कसले रूप.. ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपणाकडे शुभकार्यास सुरूवात होत नाही, तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल… हे कोडे न उलगडणारे आहे… अशी शंका आपल्या मनात आली असेल.. हो ना.. पण, यात एवढे गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही. चोर गणपती म्हणजे हळूच, चोर पावलांनी येऊन बसणारा गणपती.

चोर गणपती का म्हणतात?
सांगली नगरीचे आराध्यदेवत असणा-या श्री गणपती मंदिरातील पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण आहे. लाखो भाविकांच्या जनसागरात संपन्न होणा-या या गणेशोत्सवास दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो. ‘चोर गणपती’ गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण.गणपती मंदिरातील संस्थान गणशोत्सवाची सुरूवात ‘चोर’ गणपतीच्या आगमनाने होते.

भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील या गाभार्‍यात दोन्ही बाजूस चोर गणपतीच्या मूर्ती विधीपूर्वक बसविल्या जातात. मग येथून पंचमीपर्यत अर्थात पाचव्या दिवसांपर्यत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. चोर गणपतीचा सभामंडप विद्युत रोषणाईने झगमगून गेलेला असतो. तशी या गणपतीची अख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरूवातीपासून म्हणजे सुमारे दीडशे वर्षापासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत, असे जाणवणार देखील नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने या मूर्ती अधिक आकर्षक दिसत आहे.

चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन जाते. मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागते. खास करून चोर गणपती पहाण्यासाठी भाविक व पर्यटक हजेरी लावतात. पंचमीला उत्सवमूर्तींची जोरदार मिरवणूकीने विसर्जन होताच चोर गणपतीही पुढील वर्षापर्यत गावाला जाता‍त. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. ‘पुढल्या वर्षी लवकर या… ‘ च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो.

हत्तींची परंपरा
गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला होता. त्याला ‘लाडका बबलू’ असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे, शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. याचवर्षी त्याचे अचानक निधन झाले. त्याच्या अंत्ययात्रेवेळी जनसागर लोटला होता.

कसे जाल 
पुण्याहून सुमारे 235 कि.मी तर कोल्हापूरातून 45 कि.मी अंतर आहे. रेल्वे – सांगली दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.रस्ता मार्ग – पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय. हवाई मार्ग – कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.


Previous Post

डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रूपात… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये… आज शुभारंभ…

Next Post

राज्य सरकारकडून तडकाफडकी चार उपजिल्हाधिकारी आणि आठ तहसीलदार निलंबित

Next Post

राज्य सरकारकडून तडकाफडकी चार उपजिल्हाधिकारी आणि आठ तहसीलदार निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.