नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, G-20 बैठकीचे उद्घाटन केले. आफ्रिकन युनियन हा भारताच्या अध्यक्षतेखालील G-20 चे स्थायी सदस्य बनला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी अतिथी देशांच्या सदस्यांना आणि नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या लाकडी नेमप्लेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. यावेळी विशेष म्हणजे नेमप्लेटवर जगात सर्रास वापरल्या जाणार्या ‘इंडिया’ या नावाऐवजी ‘भारत’ लिहिलेले होते. त्यामुळे आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे की देशाचे नाव नक्कीच बदलणार आहे.
G-20 कार्यक्रमादरम्यान भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या डिनरचे निमंत्रण पत्र राष्ट्रपतींनी ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’च्या वतीने पाठवले आहे. या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेल्या ‘भारत’ या शब्दावरून आता राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार देशाच्या नावावरही डल्ला मारत असल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, राज्यघटनेच्या कलम १ मध्ये भारत, जो इंडिया होता, तो राज्यांचा संघ आहे, असे सांगत असताना त्यातून इंडिया हा शब्द का काढला जात आहे. मात्र, काँग्रेस नेते शशी थरूर यांचे म्हणणे आहे की, संविधानात इंडिया आणि भारत या दोन्हींचा उल्लेख असताना त्यात घटनात्मक आक्षेप नसावा. मात्र या नावाबाबत केवळ काँग्रेसच नाही तर भारतीय जनता पक्षाचे नेतेही भारताच्या समर्थनार्थ ट्विट आणि वक्तव्ये करत आहेत.
घटनादुरुस्तीद्वारे नाव बदलण्याची चर्चा
G-20 मध्ये भारत हे नाव वापरण्यात आल्याने या चर्चेलाही वेग आला आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये इंडियाऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात करणार आहे आणि संसदेतही इंडिया हे नाव कायमस्वरूपी भारत असे बदलले जाऊ शकते, अशी अटकळ सुरू झाली आहे.
G20 Summit PM Narendra Modi India Table Name Plate Bharat