इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – घोटाळेबाज भामटा नीरव मोदीला (वय ५१) अखेर भारतात यावेच लागणार आहे. कारण, त्याचे ब्रिटनमधील सर्व पर्याय संपले आहेत. ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात आपल्या प्रत्यार्पणाच्या विरोधातील याचिकेचा शेवटची संधी देखील नीरव मोदीने गमावली आहे. पण अजूनही नीरव मोदी आणखी काही कायदेशीर पळवाटा शोधण्याची शक्यता असल्याचेही म्हटले जात आहे.
मोदी हा भारतात हिरे व्यापारी होता. त्याला भारतातील ‘डायमंड किंग’ असेही संबोधले जात होते. मात्र भारतीय बँकांना गंडा घालून तो परदेशात पळाला होता. नीरव मोदीला युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्समध्ये अपील करण्याची मुभा आहे. दुसरीकडे नीरव मोदीचा भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यात अजूनही काही अडचणी असून त्यातून मार्ग काढणे भारतासाठी आवश्यक ठरणार आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नीरव मोदीला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता.
या निर्णयाविरोधात नीरव मोदीने ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. मागील दिवसांपासून नीरव मोदीला ब्रिटनच्या जेलमध्ये असून त्याला भारतात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. असून प्रत्यार्पण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने डिसेंबर २०१९ मध्ये आर्थिक फसवणूक कायदा २०१८ नुसार नीरव मोदीला फरारी म्हणून घोषित केले होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेमधून सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोदीने भारताततून परदेशात पलायन केले होते. मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात असून, त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
अलीकडेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तेतून बँकांनी १८ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. त्याचप्रमाणे आणखी वसुली करण्यात येणार आहे, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील नीरव मोदी हा मुख्य आरोपी आहे.
नीरव मोदीने ब्रिटन कोर्टात सांगितले होते की, त्याला भारतीय एजन्सीकडे सोपविण्यात येऊ नये, भारतातील तुरुंगांची स्थिती अत्यंत वाईट आहे. यासोबतच त्याने भारतात आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय एजन्सींनी बिट्रेनच्या न्यायालयाला सांगितले की, नीरव केवळ भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी करणे देत आहे.
नीरव मोदी सन २०१८ मध्ये नीरव मोदी फोब्र्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ८४व्या स्थानावर होता. फोब्र्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी याची जवळपास १२ हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदी याची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले होते. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची २५ लक्झरी स्टोअर्स होते.
भारतातून फरार झालेल्या नीरव मोदीने त्याच्या प्रत्यार्पणाच्या ब्रिटनमधील हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्ठात याचिका दाखल केली होती. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आपले म्हणणे मांडले होते. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या हायकोर्टाने नीरव मोदीची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळून लावत आत्महत्येची प्रवृत्ती दाखवणे हा प्रत्यार्पणापासून बचावाचा आधार बनू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर नीरव मोदीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. परंतु कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्याने अखेर त्याला भारतात यावेळेस लागणार आहे असे दिसून येते.
Fraud Nirav Modi Britain Options India Extradition