येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला व चांदवड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मनमाड जवळच्या कातरवाडी शिवारातील प्रसिध्द असलेल्या लोणच्या डोंगरावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वणवा पेटला.
हवेमुळे हा वणवा जास्त पसरत गेला. या वणव्यात वनविभागाने लावलेली हजारो झाडांची वनसंपदा जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. आग विझविण्यासाठी परिसरातील तरुणांनी धाव घेतली. मात्र, वणवा मोठ्या प्रमाणात पसरला. गेल्या तीन वर्षा पासून सलग डोंगराला आग लावण्याची घटना घडत असल्याच परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनीही वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात फारसे यश आले नाही. वणवा अनेक तास पेटला असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, याठिकाणी असलेली जैविक विविधताही नष्ट झाली आहे. वणवा नक्की कशामुळे लागला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
? दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! *तब्बल ९२१२ पदांसाठी भरती सुरू* आजच येथे, असा करा अर्ज
https://t.co/SnWIB5h6pL#indiadarpanlive #ssc #passed #candidate recruitment #job #vacancy #crpf #opportunity #candidates #employment— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 28, 2023
? *महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा…*
सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी…. https://t.co/98OfTmEUbq#indiadarpanlive #mahagav #farmers #group #success #story #akola #agriculture— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 28, 2023