बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वनविभागाचे मुख्यालय असलेल्या नव्या इमारतीचे आज उदघाटन; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

by India Darpan
डिसेंबर 18, 2022 | 5:03 am
in राज्य
0
vanbhavan e1671291424175

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नवीन प्रशासकीय इमारत वनभवन ही ‘झिरो माईल’ परिसरामध्ये असून या इमारतीमध्ये वनविभागाची एकूण 14 कार्यालये आहेत. त्यात एकूण 254 अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), वनसंरक्षक (कार्य आयोजन व सामाजिक वनीकरण), उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग, उपवनसंरक्षक (कार्य आयोजन) व विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) ही कार्यालये आहेत.

नागपूर वनवृत्तामधील भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्याबरोबरच अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरातून नागपूर मुख्यालयाच्या ठिकाणी क्षेत्रीय कामाबाबत किंवा सामाजिक वनीकरण व वन्यजीव या विविध विभागाशी कोणत्याही प्रश्नांशी निगडीत काम असल्यास, काही मदत हवी असल्यास, शेतकरी किंवा सामान्य नागरिक या इमारतीमध्ये आल्यानंतर त्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. त्याचबरोबर या इमारतीच्या कार्य कक्षेबाहेरील निर्णय घेण्यासाठीचा प्रश्न निर्माण झाल्यास रामगिरी रोडवरील मुख्य इमारतीमधील कार्यालयात त्याला समन्वय साधण्यास व त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यास या इमारतीतील कार्यालयाची भूमिका मोठी राहणार आहे. या इमारतीचे बांधकाम हे हरितगृह संकल्पनेवर आधारित आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद‌्घाटनानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे वनसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक वितरण समारंभ पार पडेल. यामध्ये वन्यजीव संरक्षण व्यवस्थापन, उत्पादन, विस्तार, नावीन्यपूर्ण, धाडसी कार्य केलेल्या एकूण 53 वन अधिकारी कर्मचा-यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॅा. वाय.एल.पी.राव यावेळी उपस्थित असतील.

Forest Head Quarter Nagpur Building Inauguration Today

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग 

Next Post

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ! नामांकित निर्मात्यांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

India Darpan

Next Post
income tax pune e1611467930671

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ! नामांकित निर्मात्यांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011