नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सध्या जगात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाने जगात जो हाहाःकार माजवला होता, त्या धक्क्यातून अद्याप कुणीच सावरलेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भातील प्रत्येक नवी बातमी सर्वसामान्यांचे टेंशन वाढविणारी ठरत आहे. त्यातच आता भारतामध्ये नव्या व्हेरियंटचे एकूण ११ रुग्ण आढळले आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील चौघांचा समावेश आहे.
देशात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती असताना, कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराचे 11 उप-प्रकार परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आले आहेत. 24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 19,227 आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 124 कोविड पॉझिटिव्ह आढळले. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे नमुने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर घेण्यात आली. तपासणीत कोरोना बाधित आढळलेल्या १२४ प्रवाशांना आयसोलेशन करण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की 124 पॉझिटिव्ह बाधितांपैकी 40 च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल आले आहेत. यापैकी, ओमिक्रॉनच्या XBB.1 सबस्ट्रेनचे जास्तीत जास्त 14 नमुने आढळले. त्याच वेळी, एकामध्ये BF.7.4.1 आढळले.
अमेरिकेहून पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चारही प्रवाश्यांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BF.7 ची लागण झालेली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. चारही लोकांना त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगमुळे कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अधिकृत माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांचे जे हाल झाले, तेच आता होणार का हा मुख्य प्रश्न आहे. पण अमेरिकेहून आलेल्या या चारही रुग्णांची प्रकृती एकदम स्थिर आहे. चारपौकी तीन प्रवासी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील आहेत, तर एक प्रवासी बिहारचा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
जीवघेणा व्हेरियंट नाही
जागतिक आरोग्य संघटनेने नवा व्हेरियंट जीवघेणा असेलच असे नाही, असे म्हटले आहे. सध्या तरी अश्याप्रकारची कुठलीही घटना समोर आलेली नाही. पण वेगाने पसरत असल्यामुळे आपण उपाययोजना करणं आवश्यक आहे. शिवाय व्यक्तिगत पातळीवरही काळजी घेणं आवश्यक आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
ही आहेत लक्षणे
नव्या व्हेरियंटमध्येही बऱ्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणेच लक्षणे आढळतात. घसा खवखवणे, खोकला येणे, ताप येणे अशी काही लक्षणे नव्या व्हेरियंटच्या संसर्गामध्ये आढळून येतात. बरेचदा रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर प्रकृती ढासळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमेरिकेतून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या एका तरुणाला अश्याप्रकारचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याची चाचणी केली, तर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती सध्या स्थिर असली तरीही त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1610914674949914624?s=20&t=cZRPeOvvKE6sOusnUQpDOA
Foreign Return 11 Passengers Covid 19 New Strain in India
Corona Sub variant