गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फुटबॉल विश्वचषक जिंकला तो अर्जेंटिनाने, परंतु जग जिंकलं ते एमबाप्पेने; कसे? घ्या जाणून सविस्तर..

डिसेंबर 19, 2022 | 4:13 pm
in इतर
0
IMG 20221219 WA0008

इंडिया दर्पण विशेष लेखमाला 
– पॅव्हेलिअन – 
फुटबॉल विश्वचषक – जग जिंकलं एमबाप्पेने

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर फ्रान्सला हरवून अर्जेंटिना जगज्जेता बनला. हा सामना संपताच जगात विविध ठिकाणी जल्लोष झाला. या सामन्याचा महानायक मेस्सी हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. यंदाचा विश्वचषक अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण ठरला. विश्वचषक जिंकला तो अर्जेंटीनाने परंतु जग जिंकलं ते एमबाप्पेने. त्याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….

याआधी १९८६ साली जेव्हा अर्जेन्टीनाने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मला आठवतंय भारतातल्या घराघरात टी.व्ही. नव्हते. मात्र तरीही फुटबॉलची जादू भारतीयांना आवडायला लागली होती. आणि त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे अर्जेंटीनातर्फे खेळणारा दिएगो मॅराडोना नावाचा जादूगर. अर्जेन्टीनाने विश्वचषक जिंकला आणि त्यावेळेला व्हीडीओ हॉल/थिएटर मध्ये पैसे मोजूनही मॅच बघतांना माझ्यासारख्यांनी मॅराडोना नावाची जादू अनुभवली होती. तब्बल ३६ वर्षांनी अर्जेन्टीना संघ पुन्हा विश्वविजयी होतांना जणू लिओनेल
मेस्सी असे नाव बदलून मॅराडोनाच खेळतोय असा भास होत होता. कतारमध्ये १० व्या क्रमांकाच्या जर्सीचा पुन्हा एकदा सन्मान झाला. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट गोड होतांना ती गोडी जगभरातल्या फुटबॉलप्रेमींनी चाखली. नंतर अनेक चढउतार आलेल्या या सामन्यात सुरूवातीची ८० मिनिटे २-० अशी आघाडी जपणाऱ्या एकट्या अर्जेंटीनाच्या पारड्यात होती. आणि ही तब्बल ८० मिनिटे एकटा मेस्सी या सामन्यावर राज्य करीत होता.

पुढे मात्र ८० व्या मिनीटाला “कहानीमे ट्वीस्ट” यावा त्याप्रमाणे फ्रान्सचा अवघ्या २३ वर्षीय कायलीन एमबाप्पेने पेनल्टी किकवर गोल साधला. मग सामना संपेपर्यंत या अॅक्शनपॅक्ड थ्रीलर चित्रपटात जसा मेस्सी लक्षात राहीला त्यापेक्षा जास्त फ्रान्सचा कायलीन एमबाप्पे लक्षात राहिला. दोन तुल्यबळ संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. हे २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे फलित म्हणावे लागेल. निर्धारीत वेळेत बरोबरी आणि अतिरीक्त वेळेत देखील तोच प्रकार, यामुळे अखेर या सामन्यातून पेनल्टी किकवर विश्वविजेता ठरला.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1604545380468723712?s=20&t=87QfxvCkdsFT3YrOtqpWtw

विश्वचषक जिंकला तो अर्जेंटीनाने परंतु जग जिंकलं ते एमबाप्पेने. गोलची हॅटट्रीक आणि सामन्यात सर्वाधिक ४ गोल करून सुद्धा ज्या पायांना विजयाचे यश मिळाले नाही ते एमबाप्पेचे पाय अखेरीस इतके जड झाले होते की त्याच्या देशाच्या राष्ट्रपतींनी त्याला आधार देवून जमिनीवरून उठवल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर त्याला सरळ उभे राहू देत नव्हते. ‘गोल्डन बूट’ मिळाला परंतु आयुष्यातल्या गोल्डन क्षणांनी हुलकावणी दिल्याच्या वेदना एमबाप्पेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या आणि कदाचित त्याचे हेच दुःख भविष्यात त्याला आणखी मोठा खेळाडू बनविण्यासाठी उपयुक्त होईल. कारकिर्दीतले सर्वोच्च यश साध्य केल्यानंतर विजयोत्सव साजरा करतांना मैदानात असंख्य उड्या मारणारा ३५ वर्षीय मेस्सी आणि जीवाचे रान करूनही विजय साध्य न करू शकल्याने जमिनीला खिळलेला २३ वर्षीय एमबाप्पे, हे
विरोधाभासापलिकडचे चित्र फुटबॉलचे भविष्य सुरक्षित हातात आहे याचीच अनुभूती देणारे होते.

अर्जेंटीनाचे आणि फ्रान्सचे फुटबॉलप्रेम अगाध आहे. लिओनेल मेस्सी नावाचा जलवा सध्या जगभरातल्या फुटबॉल विश्वावर राज्य करतोय तर एमबाप्पे नावाच्या उगवत्या सूर्याकडे फ्रान्सच्या नजरा खिळून आहेत. विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात इतका प्रचंड थरार असलेली फायनल अद्याप झालेली नसावी, असे जाणकार सांगतायेत ते उगीच नाही.

मुळात कतारचा विश्वचषक अनाेखाच होता. ज्या कतारमध्ये पिण्याच्या थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते त्या कतारमधल्या मैदानांवर हिरवळ टिकावी म्हणून दररोज १०००० लिटर पाणी मारून स्पर्धेतील ताजेपणा जपणाऱ्या कतारने ही स्पर्धा केवळ यशस्वीच करून दाखवली असे नव्हे तर आधुनिकतेच्या सर्व पातळ्यांवर कतारने या स्पर्धेला नवा आयाम दिला आहे. दोन ताकदीचे पहेलवान या स्पर्धेच्या अंतीम सामन्यासाठी निवडले जाणे आणि विजेतेपदाची ही रस्सीखेच रंगतदार होणे हे स्पर्धेच्या यशस्वीतेचे प्रतीक आहे.

Football World Cup FIFA Argentina France Mbappe by Jagdish Deore

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बोम्मईंच्या नावाने खोटं ट्विट कोणी केलं, त्यामागे कोणता पक्ष हे कळलंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

घरफोडीचे सत्र सुरुच; शहरात चार घरफोडीच्या घटना, १७ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरफोडीचे सत्र सुरुच; शहरात चार घरफोडीच्या घटना, १७ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011