मुंबई – लिओनेल मेस्सीचे नाव ऐकले तरी अर्जेंटिनाच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरते. मॅराडोनानंतर अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये आघाडीवर ठेवण्याचे काम मेस्सीने केले. त्याला त्याचे फुटबॉल आणि देशाप्रती असलेले समर्पणच मुख्य कारण आहे. या समर्पणाची प्रचिती अलीकडेच एका सामन्यात आली. या सामन्यात टाचेला दुखापत होऊन रक्त लागले तरीही मेस्सी मैदानावर खेळत राहिला आणि सामना जिंकल्यावरच तो मैदानावरून परतला.
सामन्या दरम्यान पायाला दुखापत झाल्यावर रक्त निघायला लागले. त्यामुळे मेस्सीने ड्रेसिंग करून घेतले. पण सामना खेळताना एक क्षण असाही आला की त्याच्या पायातून येणारे रक्त ड्रेसिंगलाही ऐकत नव्हते. पण तो खेळत राहिला आणि शुटआऊटपर्यंत गेलेला सामना जिंकूनच त्याने मैदान सोडले. अर्जेटिंनाच्या वतीने रोड्रीगो पॉल गोल करण्यात अपयशी ठरला मात्र मेस्सी, लिएंड्रो आणि मार्टिनेस यांनी गोल करून अर्जेंटिनाला विजय प्राप्त करून दिला.
आता अंतिम सामना ब्राझीलविरुद्ध ऐतिहासिक अश्या रिओ दि जिनेरिओ स्टेडियमवर होणार आहे. सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनॉल्टी शुटआऊटमध्ये कोलंबियाला 3-2 ने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात धडक दिली. सामना जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘एमी जबरदस्त खेळाडू आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास होता.
आमचे लक्ष्य सर्व सामने जिंकण्याचे होते. आता अंतिम सामनाही आम्ही चिंकणार.’ मॅचचा हिरो अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेज ठरला. त्याने तीन पेनाल्टी कॉर्नर वाचवले. नशिबाने साथ दिली म्हणून हे होऊ शकले असे तो म्हणाला. ब्राझीलच्या टीमचेही त्याने कौतुक केले.