शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पैसे नक्की कधी मिळणार? कृषीमंत्री सत्तार म्हणाले…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 19, 2022 | 9:15 pm
in राज्य
0
2 14 1140x570 1 e1660923821830

 

यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिला. तसेच, येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सत्तार यांनी यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतीची पाहणी केली. तसेच, आढावा घेतला.

यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे अभिमान लक्ष्मण बोभाटे यांच्या शेतात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार अशोक उईके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार रविंद्र कानडजे, गटविकास अधिकारी बी. के. पवार, रंजन कोल्हे तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री यांनी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व खरडून गेलेल्या शेतात आता लवकर पीक घेता येणार नसल्याने होणाऱ्या नुकसानीची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून मदत करण्यात येईल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतात घुसणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक स्तरावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती कृषी मंत्री यांना दिली. तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे सांगितले.

नागपूर जिल्ह्याचा दौरा आणि पाहणी
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर ग्रामीण मधील मौजा पांझरीलोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, नायब तलसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पांझरीलोधी येथील शेतकरी प्रशांत मारोती ठाकूर यांच्या कापूस शेतीची पाहणी केली. शेतात आठ ते दहा दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पुर्णत: करपून गेले आहे. तेथे पुर्नशेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी, कृषी सहायकांनी योग्य सर्व्हे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीसह योथोचित प्रस्ताव सादर करावेत. जेणे करुन अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. यावेळी गावातील शेतकरी, नागरिक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हवालदिल शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्या बांधावर जावून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सेलू तालुक्यातील लोंढापूर, कोल्ही व वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे नुकसानीची कृषिमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.विद्या मानकर, तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत यांच्यासह महसूल, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.शासन दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीला मदत देते. परंतु मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पंचनामे करून लवकरात लवकर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. पंचनामे करतांना ते बोगस होणार नाही आणि सत्य पंचनामे लपविले जाणार नाही, अशा सुचना केल्या आहे. त्याप्रमाणे अधिकारी पंचनामे करत असल्याचे पुढे बोलतांना कृषिमंत्री श्री.सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सेलु तालुक्यातील लोंढापुर शिवारात नाल्याच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. लगतच्या कोल्ही-घोराड पांदनीचे झालेले नुकसान देखील पाहिले. येथे शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी आपले दु:ख यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या त्या देखील त्यांनी समजून घेतल्या.

वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे भदाडी नदीच्या पुरामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यानुकसानीची देखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी सुध्दा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे व दु:ख त्यांनी जाणून घेतले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.मानकर यांनी जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती यावेळी मंत्रीमहोदयांना अवगत केली. तीन विभागातील सात जिल्ह्याची नुकसानीची पाहणी करणार असून त्यानंतर शासनास अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री श्री.सत्तार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Flood Heavy Rainfall Farmer Aid Agriculture Minister
Abdul Sattar Vidarbha Nagpur Vardha Yavatmal

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगावला पथदीप ४७ दिवसापासून बंद; शिवसेनेचे अनोखे कंदील आंदोलन ( व्हिडिओ)

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रेम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रेम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011