मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन शॉपिंगमध्ये एकेकाळी आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्टचे भवितव्य आता धोक्यात आले आहे. कारण सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही आपले उर्वरित शेअर्स विकले आहेत.
ऑनलाईन शॉपिंगच्या स्पर्धेत अनेक नवनव्या कंपन्यांनी एन्ट्री घेतल्यानंतर फ्लिपकार्टचे मार्केट डाऊन होऊ लागले होते. अमेझॉनने मार्केट असे काही हाती घेतले की स्नॅपडील आणि फ्लिपकार्टला लोकांनी पाठ दाखवायला सुरुवात केली. अशात फ्लिपकार्टला अधिकच वाईट दिवस आले. बन्सल ब्रदर्सने अगदी छोट्याशा खोलीतून या व्यवसायाला सुरुवात केली होती. २००७ मध्ये फ्लिपकार्ट अस्तित्वात आले होते. मात्र आता या कंपनीतून बन्सल ब्रदर्सचा काळ आता संपुष्टात आल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमधील कंट्रोलिंग शेअर्स विकत घेतले.
अधिग्रहणानंतरही एक्सेलने अलीकडेपर्यंत कंपनीतील १.१ टक्के हिस्सा राखून ठेवला होता. २०२३ मध्ये एक्सेल कंपनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडली. कंपनीने गेल्या काही वर्षांत सुमारे ६०-८० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीवर २५ ते ३० पट परतावा मिळवला आहे. सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही फ्लिपकार्टमधील आपले उर्वरित शेअर्स विकले आहेत. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टचे सह संस्थापक बिन्नी बन्सल आणि कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार एक्सेल आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट यांनी वॉलमार्टला त्यांचा हिस्सा विकून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
आधीच विकले होते शेअर्स
वॉलमार्टच्या अधिग्रहणानंतर टायगर ग्लोबलची देखील फ्लिपकार्टमध्ये कमीच भागीदारी शिल्लक राहिली होती, परंतु वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सुमारे ३.५ अब्ज डॉलर नफा कमावल्यानंतर आता टायगर ग्लोबल फ्लिपकार्ट कंपनीतून बाहेर पडली आहे. फ्लिपकार्टचे सह संस्थापक सचिन बन्सल यांनी आधीच २०१८ मध्ये वॉलमार्टला त्यांचे संपूर्ण शेअर्स विकले होते, तर त्यांचे भागीदार आणि इतर सह संस्थापकांनी फ्लिपकार्टची भागीदारी घेतल्यानंतर बिन्नी बन्सल यांनी एक छोटासा हिस्सा कायम ठेवला होता.
वीस टक्क्यांहून अधिक भागभांडवल
२००८ मध्ये जेव्हा वॉलमार्टने कंपनीचा हिस्सा विकत घेतला, तेव्हा एक्सेल आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट या दोघांकडे सुरुवातीला फ्लिपकार्टमधील २० टक्क्यांहून अधिक भागभांडवल होते, परंतु २०१८ मध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यापूर्वी हळूहळू त्यांची हिस्सेदारी कमी केली आणि ती सुमारे ६ टक्क्यांपर्यंत खाली आली.
flipkart e commerce website wallmart investment finance share