शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? मंत्री उदय सामंत म्हणाले…

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 5:34 am
in राज्य
0
0x570

रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. स्मारकातील अर्धपुतळ्यासही अभिवादन केले. या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून, त्यादिवशी लोकार्पण करण्याचा मनोदय असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अभिवादनानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्मारकाची पाहणी करत लवकरात लवकर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणासाठी साडेचार कोटीचा निधी दिला आहे. त्याचे कामही सुरु आहे. २६ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीला त्याचे लोकार्पण करु. असे कणखर नेतृत्व रत्नागिरीतून तयार झाले, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू उर्फ महेश म्हाप, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.

ratnagiri lokmanya tilak birth place memorial minister uday samant

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संसदेत सिनेमॅटोग्राफ विधेयक मंजूर… काय आहे ते… मनोरंजन क्षेत्राला काय फायदा होणार… तर प्रेक्षकांनाही होणार दंड

Next Post

फ्लिपकार्टचे भवितव्य धोक्यात? संस्थापकांनीच विकली कंपनी.. आता पुढे काय होणार?

Next Post
flipkart

फ्लिपकार्टचे भवितव्य धोक्यात? संस्थापकांनीच विकली कंपनी.. आता पुढे काय होणार?

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011