शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतापजनक! कर्ज वसुली एजंटने गरोदर महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

by India Darpan
सप्टेंबर 18, 2022 | 2:24 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले. कर्जाचे हप्ते तो फेडू शकला नाही. दरम्यान कर्जाचे हप्ते वसुलीसाठी आलेल्या एजंटने गुंडगिरी करत तातडीने हप्ते भरण्याचा तगादा लावला. याचवेळी शेतकरी, त्याची गरोदर मुलगी आणि वसुली एजंटमध्ये बाचाबाची झाली. अखेर संताप अनावर न झाल्याने वसुली एजंटने गरोदर मुलीच्या अंगावरच ट्रॅक्टर घातला. या दुर्घटनेत गरोदर मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्या मुलीचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. तेथे निदर्शने केली तसेच संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्या आरोपीला अटक करण्यात आली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हजारीबागमध्ये मिथिलेश मेहता हा शेतकरी अपंग असून त्याला महिंद्रा फायनान्सकडून मोबाईलवर मॅसेज आला होता की, त्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची 1 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी जमा करावी. परंतु मिथिलेश मेहता ही रक्कम मुदतीच्या तारखेला जमा करु शकले नाही.

महिंद्रा फायनान्स कंपनीचे अधिकारी न कळवताच ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, मात्र शेतकरी घरी न सापडल्याने कंपनीचे एजंट व अधिकाऱ्यांनी त्याचे घर गाठून ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले. तेव्हा शेतकरी मेहता आणि यांची २७ वर्षीय गरोदर मुलगी मोनिकाने शेतातून धावत येत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनिकाला चिरडून ट्रॅक्टरचालक पुढे निघून गेला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिला मृतावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.

याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून त्याच्या शोधार्थ परिसरात छापे टाकण्यात येत आहेत.

महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी झारखंडमधील घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर महिंद्रा यांनी महिंद्रा फायनान्सचे सीईओ आणि एमडी अनिश शाह यांनी म्हटले की, हजारीबागच्या घटनेमुळे आम्ही खूप दुःखी आणि अस्वस्थ आहोत. ही लज्जास्पद आणि दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कंपनीकडून सर्व सहकार्य केले जाईल.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोनिकाचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन निदर्शने केली. कुटुंबाला तत्काळ दहा लाख रुपयांची भरपाई आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तर मृत गर्भवती महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच स्थानिक पोलिसांनी सांगितले की, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी पीडितेच्या घरी जाण्यापूर्वी स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती दिली नव्हती.

This is a terrible tragedy. I strongly support @anishshah21's statement. Our hearts go out to the family in this time of grief. https://t.co/FxYejx59im

— anand mahindra (@anandmahindra) September 16, 2022

Finance Recovery Agent Murder Pregnant Women
Jharkhand Hazaribagh Mahindra Finance Farmer Tractor

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी मोठी खुशखबर

Next Post

आणखी एक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या तडाख्यात; केला धक्कादायक खुलासा

Next Post
Shama Sikander

आणखी एक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या तडाख्यात; केला धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011