इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री एका कार्यक्रमात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणी देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोक अर्थमंत्र्यांच्या या वागण्याचं जोरदार कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यक्रमाच्या संबोधनादरम्यान, एनएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक पद्मज चंद्रू यांना तहान लागली आणि त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पाणी मागितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे पाहिलं आणि जागेवरुन उठत चंद्रू यांना त्यांनी पाणी दिलं. त्यानंतर चंद्रू स्वतः पाण्याची बाटली उघडून पाणी पितात आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानतात. त्यांच्या या वागण्यावर संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला.
हा व्हिडिओ नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये NSDL गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम लाँच करण्यात आला.
संस्काराचा खरा अर्थ हाच आहे, तुम्ही कितीही उंचीवर पोहोचलात तरीही, पण तुमचे सेवाभावी संस्कार कधीही विसरू नका. कोणी काहीही बोलो, भाजपची खिल्ली उडवो, पण आज कोणत्याही राजकीय पक्षात जर काही संस्कृती उरली असेल तर ती भाजप आहे. मोदींचे मंत्री किती नम्र आहेत. अप्रतिम… अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांचे हे वर्तन माझ्या हृदयाला भिडले. अशा शब्दांमध्ये युझर्सनी कौतुक केले आहे.
https://twitter.com/dpradhanbjp/status/1523352651051802625?s=20&t=hMSnscyWnxF9m6TeIpLM2g