नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज संसदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. याचदरम्यान सीतारामण म्हणाल्या की, जुनी प्रदुषित वाहने (polluting vehicles) बदलणे हे आमचे धोरण आहे. मात्र, हे वाक्य म्हणताना अर्थमंत्री चुकून replacement of old political (जुने राजकीय बदल) असे म्हणाल्या. त्यावरून संसदेच्या सभागृहात जोरदार हशा पिकल्या. मंत्र्यांपासून ते खासदार आणि अधिकारी हे सारेच खळकळून हसले. अर्थमंत्र्यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी शब्द सावरून घेतला आणि अर्थात हेही लागू होतं असं म्हणत स्मितहास्य केलं.
बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Madhurendra13/status/1620670423183806465?s=20&t=DI9jp8hFQya2D7JOIrGVCQ
Finance Minister Statement Parliament Joke Video