विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली
इतिहासात अश्या अनेक कहाण्या दडलेल्या आहेत, ज्या कधीतरी बाहेर आल्या तर एकल्यावर आपल्या भूवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक कहाणी आहे आणि त्याची खलनायिका एक महाराणी आहे. ही महाराणी म्हणजे केवळ गर्विष्ठ आणि आक्रमक नव्हती तर एक खुंखार सिरीयल किलरही होती.
अश्या तर अनेक सिरीयल किलरच्या कहाण्या आपण एकल्या असतील मात्र या महाराणीची कथा अंगावर काटे उभे करणारी आहे. ही महाराणी अविवाहित तरुणींचा खून करून त्यांच्या रक्ताने अंघोळ करायची. हंगेरी येथे राहणाऱ्या या महाराणीचे नाव होते एलिझाबेथ बाथरी. तिला इतिहासातील सर्वांत खतरनाक सिरीयल किलर म्हणून ओळखले जाते.
१५८५ ते १६१० या कालावधीत बाथरीने ६०० हून अधिक तरुणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने अंघोळ केली होती. हे ती एका अंधश्रद्धेतून करायची. कुणीतरी तिला असे सांगितले होते की सौंदर्य कायम ठेवायचे असेल तर अविवाहित तरुणींच्या रक्ताने अंघोळ कर. तिला हा मार्ग आवडला आणि त्यातून तिने क्रौर्याची मर्यादाच ओलांडली. अर्थात मुलींना मारल्यानंतरही त्यांच्या प्रेतासोबत ती दुर्व्यवहार करायची. मृत तरुणींच्या शरीराचे मास ती आपल्या दाताने कापायची. पण याहून भयंकर म्हणजे तिच्या या कामात तिचे तीन नौकरही साथ द्यायचे.









