नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात विशेष दूध मोहिम राबवण्यात येत आहे. सदर मोहिम ही अन्न व औषध प्रशासन नाशिक व दूध भेसळ समिती यांच्या संयुक्त समन्वयाने राबवण्यात येत आहे.
सदर मोहिमेत १२ मार्च रोजी सिन्नर तालुका व सिन्नर चेक पोस्ट तसेच शिंदे-पळसे चेक पोस्ट येथे दूध या अन्न पदार्थाच्या सर्व्हेक्षण नमुन्यांची मोहिम घेण्यात आली. सदर मोहिमेत ४९ दूध या अन्न पदार्थाचे विविध विक्रेत्यांकडून जसे दूध वाहतुक टँकर, दूध संकलन केंद्र येथून सर्व्हेक्षण अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. सदर अन्न नमुने प्रयोगशाळेकडून तपासूण घेण्यात येणार असून त्यानुसार प्राप्त अहवालानुसार नियमानुसार पुढील आवश्यक कार्यावाही घेण्यात येणार आहे, तसेच सदर व्यवसायासाठी कायदयानुसार आवश्यक असलेले परवाना व नोंदणी यांची ही तपासणी करण्यात आली.
सदरची धडक मोहिम ही या पुढे ही सुरु राहणार आहे. तरी अन्न व्यवसाईकांनी दूध या अन्न पदार्थात भेसळ करु नये, भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, तरी नागरीकांना विनंती करण्यात येते की दुध भेसळी संबधी माहिती असल्यास Fssai च्या वेबसाईडवर तक्रार नोंदवावी.
सदरची कार्यवाही महेश चौधरी, सह आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक तसेच बाबासाहेब पारधे, अप्पर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दुध भेसळ समिती नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिनेश तांबोळी व विनोद धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, सुहास मंडलीक संदीप तोरणे व गोपाल कासार, गोविंद गायकवाड, अमित रासकर, श्रीमती अश्विनी पाटील अन्न सुरक्षा अधिकारी नाशिक तसेच योगेश नागरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, अनंत साखरे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग व वाघ, वजन व मापे निरिक्षक , नाशिक यांच्या पथकाकडून करण्यात आली.