मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नक्की कधीपासून आर्थिक मदत मिळेल या प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारला आज चांगलेच धारेवर धरले. याप्रश्नी विधानसभेत गदारोळ झाला. अखेर याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घ्यावी लागली. येत्या १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
बघा, यासंदर्भातील व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1562015619633287174?s=20&t=NDzrt4TDIcJzm9LPuVYo5Q
Farmers Financial Help State Government Announcement
Heavy Rainfall Crop Loss Devendra Fadanvis
Maharashtra Assembly Session