बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक; उस्मानाबादमध्ये बस फोडल्या

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 11:21 am
in संमिश्र वार्ता
0
j e1667022693323

 

इंडिया दर्पण वृत्तसेवा
उस्मानाबाद : येथील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले असून, अज्ञातांनी एसटी बस फोडल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळल्याचा प्रकारही समोर आला असून, याचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या वाहतुकीवर झाला आहे.

ठाकरे गटाकडून उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेलं कैलास पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानाबादमध्ये उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील डेपोतील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिस बंदोबस्तही वाढण्यात आला आहे. अनेक शेतकरी हे कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. या सगळ्यामुळे आता उस्मानाबादेतली पीक विम्याचं आंदोलन आता चिघळत असल्याचं दिसत आहे.

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी २४ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन सुरु केलं होतं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, अशी त्यांची मागणी होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कैलास पाटील आमरण उपोषण सुरु आहे. आमरण उपोषण करणाऱ्या कैलास पाटील यांच्या समर्थनात उतरलेल्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केलं आहे. उस्मानाबादमधील वेगवेगळ्या भागात या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्यानं परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून विनंती
कैलास पाटील यांना प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीच एक पत्र देण्यात आलं होतं. उपोषणामुळे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यानं प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आपण उपोषण सोडणार नाही, असं कैलास पाटील यांनी म्हटलं होतं.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – कितीतरी गोष्टी क्षुल्लक असतात

Next Post

जोधपूर हवाई तळावर ‘गरूड- VII’ सराव

India Darpan

Next Post
Photo2EHEA e1667023083705

जोधपूर हवाई तळावर ‘गरूड- VII’ सराव

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011