India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दुर्दैवी! बापलेकाला एकाचवेळी अग्नीडाग देण्याची वेळ… संपूर्ण खडकी गाव रडतंय… मालेगाव तालुक्यातील दुर्घटना

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खडकी येथे बापलेकाला एकाचवेळी अग्नीडाग देण्याची वेळ आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच, या घटनेमुळे जणू संपूर्ण गावच रडत असल्याचे चित्र आहे.

विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील कांदा काढणी सुरु होते. त्याचवेळी मजुरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पंढरीनाथ कळकमकर हे जात होते. त्याचवेळी शेतातील सर्विस वायर त्यांना खाली पडलेली दिसली. रस्त्यातून ती बाजूला करण्यासाठी ते पुढे सरसावले. त्याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

मुलगा संकटात असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील पांडूरंग कळमकर हे तातडीने धाऊन गेले. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. वादळी वारा व व पावसामुळे सर्व्हिस वायर मध्ये करंट उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले. ही बाब कळमकर बापलेकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळेच त्यांनी वायरला थेट हात लावला. अखेर या दुर्घटनेत बापलेकाचा मृत्यू झाला आहे. शेतातील मजुरांनी तातडीने दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अखेर शोकाकुल वातावरणात बापलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, या घटनेमुळे गावात अतिशय शोकपूर्ण वातावरण आहे.

🟫 #nashik #crime
आधी अ‍ॅप डाऊनलोड करायला लावलं…
मग असं केलं काही की….
*त्याने डोक्याला हातच लावला…*
https://t.co/BnAX975KqK#indiadarpanlive #nashikcrime #police##cybercrime

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 15, 2023

Farmer Father and son death in Farm Malegaon Taluka


Previous Post

नव्या भरतीत ‘त्या’ शासकीय पदांचा पगार चक्क मुख्य सचिवांपेक्षा अधिक…. विधिमंडळात असे झाले उघड

Next Post

अमृता पवार यांच्या जाण्याने पक्षाचे किती नुकसान होईल? भुजबळांवरील आरोपांचे काय? राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणाले…

Next Post

अमृता पवार यांच्या जाण्याने पक्षाचे किती नुकसान होईल? भुजबळांवरील आरोपांचे काय? राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणाले...

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group