मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खडकी येथे बापलेकाला एकाचवेळी अग्नीडाग देण्याची वेळ आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच, या घटनेमुळे जणू संपूर्ण गावच रडत असल्याचे चित्र आहे.
विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील कांदा काढणी सुरु होते. त्याचवेळी मजुरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पंढरीनाथ कळकमकर हे जात होते. त्याचवेळी शेतातील सर्विस वायर त्यांना खाली पडलेली दिसली. रस्त्यातून ती बाजूला करण्यासाठी ते पुढे सरसावले. त्याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
मुलगा संकटात असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील पांडूरंग कळमकर हे तातडीने धाऊन गेले. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. वादळी वारा व व पावसामुळे सर्व्हिस वायर मध्ये करंट उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले. ही बाब कळमकर बापलेकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळेच त्यांनी वायरला थेट हात लावला. अखेर या दुर्घटनेत बापलेकाचा मृत्यू झाला आहे. शेतातील मजुरांनी तातडीने दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अखेर शोकाकुल वातावरणात बापलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, या घटनेमुळे गावात अतिशय शोकपूर्ण वातावरण आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1635950319472345090?s=20
Farmer Father and son death in Farm Malegaon Taluka