मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी काढलेल्या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मावडी येथील माकपाचे मोर्चेकरी आणि शेतकरी पुंडलिक आंबु जाधव (वय ५८ वर्षे) यांचे शेतकरी पायी लॉंग मार्च दरम्यान वाशिंद (ता. शहापूर) येथे रस्त्यात निधन झाले आहे.
या घटनेची दखल घेत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ततेचा अधिकृत शासनादेश काढत नाही तोवर लाँग मार्च कायम राहिल, तो मागे फिरणार नाही, असा निर्णय किसान सभेने घेतला आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1636739106385563651?s=20
Farmer Death in Kisan Long March in Mumbai