चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतातून जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून वृद्ध शेतकर्याचा दुर्दैवी अंत झाला. तालुक्यातील धोतरखेडे शिवारात ही घटना घडली. नामदेव भिकाजी निफाडे (वय ८५) रा. धोतरखेडे शिवार हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास लक्ष्मण निफाडे यांच्या शेतातील विहिरी जवळून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस पाटील योगेश पारधी यांनी देत वडनेर भैरव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. हवा. माळी हे अधिक तपास करीत आहे.
Farmer Death Farm Well Drown Crime