India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेती, प्लॉटमध्ये होणारी घुसखोरी थांबणार; आता थेट उपग्रहाद्वारेच होणार जमिनीचे रक्षण

India Darpan by India Darpan
November 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  तुमच्या सातबारा उताऱ्यानुसार जमीन शाबूत आणि जागेवर आहे का, शेताचा बांध कुणी कोरला आहे का, दुसऱ्याची शेती विकत घेताना दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात जमीन पूर्ण ताब्यात आली आहे का, अशा सगळ्या प्रश्नांना आता योग्य उत्तर मिळू शकणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यासाठी उपक्रम सुरु केला असून, पुढील दोन वर्षांमध्ये हा उपक्रम राज्यभरात पू्र्ण करण्याचा मानस आहे.

जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन सातबारा उताऱ्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी असेल व त्याच्याकडून सातबारा उताऱ्यानुसार जमीन महसूल गोळा केला जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे जमीन खरेदीच्या व्यवहारांतही पैशांचा पूर्ण मोबदला अर्थात पूर्ण जमीन ताब्यात आली का याची पडताळणी आवश्यक असते. यावर भूमी अभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावर भूमिअधिलेख तोडगा काढला असून, सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाची जोडणी करून जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. राज्यातील बारामती आणि खुलताबाद या दोन तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

याविषयी भूमिअभिलेख जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू यांनी माहिती दिली असून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पुणे व औरंगाबाद जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. त्यानुसार बारामती व खुलताबाद तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांचा त्यात समावेश आहे, तर बारामती तालुक्यातील बुऱ्हाणपूर गावातील मोजणी पूर्ण झाली आहे. या नकाशांवरून एका शेतकऱ्याच्या हद्दीवरून इतर जमिनींची मोजणी करणे, हद्द ठरविणे शक्य होईल, जीआयएस रेफरन्सिंग मॅपमुळे जमिनीचे नकाशे पाहणे शक्य, सरकारी, तसेच खासगी जमिनींवरील अतिक्रमणे टाळता येणे शक्य होणार आहे.

जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमची मदत
शेताचा किंवा जमिनीचा सातबारा उतारा उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाला जोडण्यासाठी जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. यात रोव्हर मशीन वापरून जमिनीचे किंवा तुकड्याचे अक्षांश व रेखांश मिळतील. हे अक्षांश व रेखांश प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी जोडून सातबारा उताऱ्याशी जोडले जातील. त्यातून जमीन साताबारा उताऱ्यानुसार आहे त्या स्थितीत आहे की शेजाऱ्याने कोरून खाल्ली आहे, याचा उलगडा होणार आहे. ताब्यातील प्रत्यक्ष जमीन कमी असल्याचे समजल्यास त्याला कायद्यानुसार ती पूर्ववत करता येईल. त्यामुळे हद्दीचे वाद मिटण्यास मदत होणार आहे.

Farm Plot Encroachment Satellite Land Protection


Previous Post

उद्धव ठाकरे गटाला नाशकात मोठे खिंडार पडणार? अशा सुरू आहेत हालचाली

Next Post

पुण्यात उभारणार आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

पुण्यात उभारणार आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group