विशेष प्रतिनिधी, मुंबई
केरळमधील मलबार गोल्ड आणि हिरे यांची विक्री करणाऱ्या प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकर भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने देशभरातील कार्यालयात ५ हजाराहू अधिक रिक्त जागा भरण्यासाठी जाहीर केले.
भरती संदर्भात मलबार गोल्डने म्हटले आहे की, सध्याच्या रिक्त जागा हे देशभरातील दागिन्यांच्या किरकोळ विक्री, स्टोअरचे कामकाज आणि लेखापाल यांच्या कामाशी संबंधित आहेत. कंपनीच्या या भरतीत महिलांसाठी चांगली संधी आहे. कारण यापैकी अर्ध्या पेक्षा जास्त पदे योग्य महिला उमेदवारांसाठी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच बीटेक आणि एमबीए विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि प्रशिक्षण संधी देखील देण्यात येत आहेत. या ऑफर अंतर्गत पात्र इंटर्न किंवा प्रशिक्षणार्थी किरकोळ विक्री आणि दागिन्यांच्या ऑपरेशनची माहिती मिळवू शकतात.
मलबार गोल्डने म्हटले आहे की, ज्वेलरी डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग (आर्टिझन्स), सप्लाय चेन मॅनेजमेन्ट, मर्चेंडायझिंग, प्रोजेक्ट एक्झिक्यूशन, फायनान्स अँड अकाउंट्स, बिझिनेस नालिस्टस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) यासारख्या क्षेत्रात सदर भरती सुरू आहे. या नियुक्त्यांपैकी बहुतेक नियुक्त्या कंपनीच्या कोझिकोड येथील मुख्यालय आणि बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता येथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आहेत.
मलबार ग्रुपचे चेअरमन एम पी अहमद म्हणाले की, आमच्या कंपनीची भरती मोहीम खात्रीच्या दागिन्यांच्या रिटेल ब्रँड बनण्याच्या दृष्टीनुसार असून शोरूमची संख्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने कंपनी जगातील आघाडीचे ज्वेलरी ब्रँड बनण्याच्या मार्गावर आहे. समाजाबद्दलची आपली जबाबदारी समजूनच कंपनीने अतिरिक्त हजारो चांगल्या नोकर्या तयार केल्या आहेत.