मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिंदे गटाच्या नेत्याकडून सरकारी चतुर्थ श्रेणी महासंघाच्या नेत्यावर हल्ला; मंत्रालय परिसरातील घटना

by Gautam Sancheti
डिसेंबर 21, 2022 | 3:29 pm
in राज्य
0
mantralay 2

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर मंत्रालयाच्या परिसरात आकाशवाणी आमदार निवास येथे मंगळवारी (ता. २०) रात्री माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला. दी महाराष्ट्र मंत्रालय को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचादेखील गळा आवळण्याचा प्रयत्न झाला तर वरिष्ठ लिपिक संगीता मोरे यांनाही धमकावण्यात आले. याप्रकरणी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी पुढील हस्तक्षेप केल्यामुळे भाऊसाहेब पठाण थोडक्यात बचावले. तसेच पोलिसांनाही लगेच पाचारण करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आज सकाळी हा प्रकार समजल्यानंतर मंत्रालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात खळबळ माजली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेण्याचा निर्णय संतप्त कर्मचारी वर्गाने घेतला आहे.

दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. त्याचा राग मनात ठेवून वचपा काढण्याच्या हेतूने आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी या सोसायटीत आमची युनियन असून सभासदांची वर्गणी पतपेढीच्या मार्फत भरा तसेच दोघा कर्मचा-यांची संचालक मंडळावर नियुक्ती करा, अशी मागणी करत काल पतसंस्थेत येऊन वाद घालण्यास सुरूवात केली. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने ते दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संस्थेत जात असतात. भाऊसाहेब पठाण आणि त्यांचे साथीदार दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असताना तिथे येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी युनियनची वर्गणी पतसंस्थेने भरणे नियमाबाह्य आहे ते करता येणार नाही तसेच दोघा कर्मचा-यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगूनही हल्ला करण्याचा उद्देश्य असल्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी काचेची बाटली भाऊसाहेब पठाण यांच्या अंगावर फेकून मारली. त्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. तसेच त्यांच्या एका सहका-याने श्री. पठाण यांच्यासमवेत असलेल्या प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबला. या जीवघेण्या हल्ल्यामुळे सर्वजण हादरून गेले. त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी वेळीच पुढील अनर्थ टाळला.

हा हल्ला पूर्वनियोजित होता. कारण आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी ते येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणून ठेवले होते. तसेच भाऊसाहेब पठाण हे येणार ही वेळदेखील त्यांना माहित होती. त्यामुळेच संध्याकाळी नेमके त्या वेळेत येणे तसेच रीतसर निवेदन न करता दादागिरीची भाषा करणे, अर्वाच्च शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे आणि कळस म्हणजे जीवघेणा हल्ला करणे, या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याची कर्मचारी वर्गाची मागणी आहे. त्याचबरोबर संगीता मोरे यांनादेखील अर्वाच्च शब्दात बोलून धमकावण्यात आले असून त्याची दखल देखील राज्य महिला आयोगाने घ्यावी, अशीही समस्त महिला व पुरुष कर्मचारी वर्गाची मागणी आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनादेखील कर्मचा-यांकडून निवेदन देण्यात आले आहे

EX Mp Attack on Government Employee Leader in Mantralay

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरडी सर्कलवर जॉगिंग ट्रॅक, गतिरोधकासह विविध कामांच्या मागणीसाठी स्थानिकांची निदर्शने

Next Post

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
Next Post
corona 8

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011