नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे चिरंजीव हर्षल गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावीत यांच्या निर्मला गावित या कन्या आहेत. त्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. तसेच त्यांची कन्या नयना गावित या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर, हर्षल हे बांधकाम व्यावसायिक होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तरुण मुलाचे निधन झाल्याने माजी आमदार गावित यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षल गावित यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.