India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

India Darpan by India Darpan
October 4, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांना अनेक महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक महिने तुरुंगात आहेत. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जामीन झाल्यानंतरही अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. त्याचे कारण म्हणजे सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही. अशा स्थितीत ते अजूनही तुरुंगातच राहणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर येण्याच्या आशा वाढल्या आहेत.

ईडीने अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. ७३ वर्षीय देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वप्रथम, सीबीआयने एप्रिल २०२१ मध्ये अनिल देशमुखविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे ईडीने नव्याने एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शहरातील बारमालकांकडून पोलिसांच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप केला होता. यात बडतर्फ अधिकारी सचिन वाजे यांचेही नाव पुढे आले आहे.

एनआयएकडून स्फोटके अँटिलियाच्या बाहेर ठेवल्याप्रकरणी सचिन वाजेचा तपास सुरू आहे. हे स्फोटक असलेले मनसुख हिरेन याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. सचिन वाजे हा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे समजते. परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडीने तपासाअंती दावा केला की, सचिन वाजेने बारमालकांची बैठक बोलावली होती. यानंतर, डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान, त्याने काही वेळा मालकांकडून ४.७० कोटी रुपये वसूल केले. एजन्सीने सांगितले की वसूल केलेली रक्कम अनिल देशमुख यांना त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यामार्फत दोन हप्त्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.

Ex Home minister Anil Deshmukh Bail Court
Legal


Previous Post

आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही रिलायन्सचा गागाट; अमेरिकन कंपनीशी केली हातमिळवणी

Next Post

दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ मोठे निर्णय

Next Post

दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ मोठे निर्णय

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group