इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कितीही टेन्शन असले तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिला की सगळा ताण, टेन्शन पळून जातंच. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने नुकतीच १४ वर्षे पूर्ण केली. सध्या ही मालिका काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. १४ वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. याच मालिकेत गेली १४ वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो काही दिवसांपूर्वीच सोडला होता. आता या मालिकेत ‘तारक मेहता’चे पुनरागमन झाले आहे.
अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्याने मालिकेचा ट्रॅक देखील बदलण्यात आला होता. नव्या ट्रॅकनुसार तारक मेहता नवीन ऑफिसच्या सेटअप निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खळखळवून हसवणाऱ्या या पात्राला प्रेक्षक खूपच मिस करत होते.
अखेर या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी यापूर्वीच दिले होते. मालिकेचे निर्माते काही दिवसांपासून या पात्रासाठी नवीन अभिनेत्याच्या शोधात होते. निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा मिळाला आहे. गेली १४ वर्ष तारक मेहता म्हणून झळकलेल्या शैलेश लोढा यांची रिप्लेसमेंट शोधणं तसं कठीणच होतं. मात्र, आता त्यांना नवीन अभिनेता मिळाला आहे.
अखेर या मालिकेत सचिन श्रॉफ हे तारक मेहताची भूमिका करणार आहेत. मालिकेत त्यांची जबरदस्त एण्ट्री होणार आहे. त्यासाठीच निर्मात्यांनी त्याचा एक प्रोमोही सादर केला आहे. मालिकेत तारक मेहता यांची पत्नी अंजली ही आतूरतेने तारक यांची वाट पाहत असते. आणि आता गणेशोत्सवातच तारक गोकुलधाममध्ये प्रकट होणार आहेत.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1569725092359294976?s=20&t=AvWH–llEVJ_r_u9b5FBcg
Entertainment TMKOC TV Show New Actor Entry
Tarak Mehta ka Oltah Chashmah