नवी दिल्ली – वादग्रस्त कृषी कायदे, पेगॅसस हेरगिरी यासह इतर मुद्यावर संसदेच्या पावसाळी अधिवेशन एकत्रीतरित्या सरकारला घेरण्यासाठी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील कक्षात १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, डीएमके, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॅान्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) ,व्हिसीके पार्टी यांचा समावेश होता. यावेळी दोन्ही सदनात आवाज उठवण्यासाठी रणनिती तयार करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला चर्चा करण्याची इच्छा नसेल तर आणखी कोणत्या मुद्दयावर चर्चा करणार असा प्रश्न उपस्थितीत केला. तर राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी विरोधी नेते तर सोडाच, पण, स्वतच्याच मंत्र्याच्या पत्नी आणि मुलांनाही सोडलं नाही. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. हे अतिशय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1420271582333837313?s=20