गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत होणार या कलाकाराची एण्ट्री?

by India Darpan
ऑगस्ट 25, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
tmkoc1

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कितीही टेन्शन असले तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिला की सगळा ताण, टेन्शन पळून जातंच. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने नुकतीच १४ वर्षे पूर्ण केली. सध्या ही मालिका काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. १४ वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. याच मालिकेत गेली १४ वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो काही दिवसांपूर्वीच सोडला होता. आता या मालिकेत ‘तारक मेहता’चं पुनरागमन होणार आहे.

अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्याने मालिकेचा ट्रॅक देखील बदलण्यात आला होता. नव्या ट्रॅकनुसार तारक मेहता नवीन ऑफिसच्या सेटअप निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खळखळवून हसवणाऱ्या या पात्राला प्रेक्षक खूपच मिस करत होते.

अखेर या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा मिळाला आहे. मालिकेचे निर्माते काही दिवसांपासून या पात्रासाठी नवीन अभिनेत्याच्या शोधात होते. गेली १४ वर्ष तारक मेहता म्हणून झळकलेल्या शैलेश लोढा यांची रिप्लेसमेंट शोधणं तसं कठीणच होतं. मात्र, आता त्यांना नवीन अभिनेता मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता तारक मेहतांच्या भूमिकेत अभिनेते जयनीरज राजपुरोहित दिसणार आहेत. अभिनेते जयनीरज राजपुरोहित ‘बालिका वधू’ या मालिकेत झळकले होते. याशिवाय ते ‘ओह माय गॉड’, ‘आउटसोर्स’ आणि ‘सलाम वेंकी’सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसले आहेत. दरम्यान, अद्याप शोचे निर्माते किंवा जयनीरज राजपुरोहित यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Entertainment TMKOC TV Show New Actor Entry
Tarak Mehta ka Oltah Chashmah

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्माष्टमी विशेष लेखमाला – भगवान श्रीकृष्णाने येथे केला देहत्याग

Next Post

औरंगाबाद तथा संभाजीनगरचे पालकमंत्री पद कुणाला? सत्तार, शिरसाट, भुमरे की सावे?

India Darpan

Next Post
FaLxrteVUAAZugd e1661353464151

औरंगाबाद तथा संभाजीनगरचे पालकमंत्री पद कुणाला? सत्तार, शिरसाट, भुमरे की सावे?

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011