इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॉमनवेल्थ गेम्स बर्मिंगहॅममध्ये 28 जुलैपासून सुरू होत आहेत, ज्यामध्ये महिला T20 क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला. कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी त्याच्या ठोस तयारीचा पुरावा सादर केला. इंग्लंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावांची मजल मारली.
जगातील नंबर 1 टी 20 गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने आपल्या बॅटने कमाल दाखवली. सोफीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात अवघ्या 12 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या. एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात 26 धावा चोपल्या. त्या बळावर इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 176 धावांची विशाल धावसंख्या उभारली.
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची सदस्य असलेल्या सोफी एक्लेस्टोनने तीन सामन्यांच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. सोफी एक्लेस्टोनला सामना आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेला या धावसंख्येचा पाठलाग करणं जमलं नाही. त्यांचा 38 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये 3-0 ने क्लीन स्वीप केलं. बर्मिंघम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इंग्लंडने सुवर्णपदकासाठी आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे.
सोफी एक्लेस्टोनने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मसाबात क्लासची जोरदार धुलाई केली. क्लासच्या एका षटकात एक्लेस्टोनने 26 धावा वसूल केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार होते. क्लासच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक्लेस्टोनने दोन चौकार वसूल केले. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर एक्लेस्टोनने षटकार खेचला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा एक्लेस्टोनने चौकार लगावला. डावाचा शेवट तिने षटकारानेच केला.
https://twitter.com/englandcricket/status/1551839749261758464?s=20&t=9txIEeorPHhhgnhGw0UOpA
एक्लेस्टोनने या नंतर गोलंदाजीतही कमाल दाखवली. तिने 4 षटकात 24 धावा देऊन 2 विकेट काढल्या. एक्लेस्टोनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. एक्लेस्टोनने सीरीज मध्ये 5 विकेट काढल्या. प्रति ओव्हर तिचा इकॉनमी रेट 6 धावा होता. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात जोरदार धुलाई झाली. खासकरुन मसाबात क्लासच्या 4 ओव्हर मध्ये 62 धावा फटकावण्यात आल्या. तिने टाकलेल्या 24 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. अयाबोंगे खाकाने 4 ओव्हर्स मध्ये 33 धावा दिल्या.
इंग्लंड दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ एकही वनडे किंवा टी 20 सामना जिंकू शकला नाही. सोफी एक्लेस्टोनच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर, इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला आहे.
विशेष म्हणजे ताजमिन ब्रिट्सचे (५९) अर्धशतक झळकावूनही दक्षिण आफ्रिकेला सहा बाद १३८ धावांवर रोखण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. एक्लेस्टोनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. बर्मिंगहॅममध्ये 28 जुलैपासून राष्ट्रकुल खेळ सुरू होत आहेत, ज्यामध्ये महिला टी-20 क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
England T20 Match Within Six balls Match Change Video