सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंजिनिअरींग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरताय? अशी घ्या काळजी

ऑक्टोबर 14, 2022 | 5:30 pm
in इतर
0
exam

इंजिनिअरींग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरताय?
अशी घ्या काळजी

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २०२२ पासून CET Cell वर सुरु झालेली आहे. त्यापैकी रेजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन आणि कॉन्फर्मेशन ह्या प्रक्रिया पार पडल्यात. तसेच कागदपत्रांबाबत काही समस्या असल्यास त्याचा निराकरणाचा कालावधीसुद्धा संपला आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा CAP राऊंड म्हणजेच आपल्याला हवे असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शाखा (Branch) यांचा पसंतीक्रम आपल्या लॉगईन मधून द्यावयाचा आहे. त्याची सुविधा १३ ते १५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतच असणार आहे याची सर्वप्रथम नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम देताना पहिल्या कॅप राऊण्डसाठी आपण जवळपास ३०० पर्याय देऊ शकतो अशी तरतूद CET Cell ने करून दिलेली आहे, प्राधान्यक्रम निश्चित करताना आपणास काय काळजी घ्यायची आहे ते विस्तृतपणे मांडण्याचा येथे प्रयत्न करण्यात आला आहे.

सर्व प्रथम ऑप्शन फॉर्म भरताना अगोदर आपल्या सोबत स्वतःने तयार केलेली कॉलेजेस आणि ब्रँचेस शाखा यांची यादी असणे महत्वाचे आहे. यादी तयार करताना जे कॉलेजेस आपण निश्चित करत आहात त्यांची मागील वर्षाची ब्रँचेसनुसार आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ लिस्ट बघणे गरजेचे आहे त्यासोबत स्वतःचे CET आणि JEE गुण समोर असणे गरजेचे आहे. कॉलेज निवडताना त्याचे नॅक मानांकन, NBA आफिलियेशन, पडताळणी हे बघणे गरजेचे आहे याची इतंभूत माहिती आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना वेबसाईटवर मिळेल. त्याचप्रमाणे ह्या महाविद्यालयात मूलभूत सुविधा उदा. वर्ग आणि प्रयोगशाळा, प्रयोगशाळेतील संसाधने, पूर्णवेळ उत्तम क्वालिफाईड शिक्षक, हॉस्टेल सुविधा, विद्यार्थी कल्याण समिती, वेळापत्रकानुसार होणाऱ्या तासिका तसेच प्रात्यक्षिके या व अश्याच बाबींची माहिती त्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवरून किंवा त्या महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांकडून आपण संकलित करू शकतात.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणारे उपक्रम, विविध औद्योगिक प्रकल्पांना भेटी, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद तसेच मुलाखती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विविध परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र, NPTEL, SWAYAM, Google Club, AWS Academic course, Coursera यांसारखे मान्यताप्राप्त कोर्सेस त्या महाविद्यालयात घेतले जातात का? मागील सर्व वर्षांची प्लेसमेंट्स, उच्चशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अश्या अनेक बाबींची माहिती गोळा करणे गरजेचे आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असेल अश्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती कागदपत्रांची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर मिळते, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी EWS कोट्यामधून पर्याय निवडू शकतात. परंतू त्यांच्याकडे चालू वर्षाचे EWS प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, अन्यथा EBC आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्गातून शिष्यवृत्ती मिळवू शकतात. परंतू त्यासाठीही चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे.

ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास गुंतागुंत वाढविण्या ऐवजी भुजबळ नॉलेज सिटीतील एफ. सी. सेंटरला जाऊन सल्ला घेऊन फॉर्म भरू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो व चुका टळू शकतात. बऱ्याचवेळा असे निदर्शनास आले आहे की विद्यार्थी आवडत्या शाखेत प्रवेश न मिळाल्यामुळे नाराज होतात किंवा आवडत्या शाखेत प्रवेश मिळतो परंतू आवडते महाविद्यालय मिळत नाही अश्याने विद्यार्थी नैराश्यात जातात आणि शिक्षणापासून वंचित राहतात. बऱ्याचवेळा विद्यार्थी स्वतःचे निर्णय घेत नाहीत आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे ते फक्त ठराविक अभियांत्रिकी विद्याशाखेचाच विचार करत राहतात.

विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे ज्या विद्याशाखेत क्रमांक आला त्यात प्रवेश घ्यावा. येत्या काळात केंद्रशासनाचे तसेच राज्यशासनाचे मोठे मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत त्यात सेमीकण्डक्टर, सुरक्षा यंत्रणा, रस्ते व वाहतूक विभाग, विद्युत मोटर वाहन, बांधकाम क्षेत्र अश्या आणि बऱ्याच प्रकल्पांची निर्मीती युद्धपातळीवर चालू आहे त्यात मेकॅनिकल, सिव्हिल, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स ई. विद्याशाखांमध्ये सुवर्ण संधी निर्माण होणार आहेत. तसेच ह्याच विद्याशाखांमधून विद्यार्थी भविष्यात स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप माध्यमातून स्वतः तसेच इतरांसाठी रोजगार निर्मिती करू शकतात. त्यामुळे कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाल्यानंतर निराश न होता जिद्दीने नवनिर्मिती करावी. विद्यार्थ्यांनी दिलेल्या सर्वबाबींचा शांतपणे विचार करावा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन आणि प्रवेश प्रक्रियेसाठी शुभेच्छा इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग, भुजबळ नॉलेज सिटीचे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खैरनार यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

Engineering Admission Option From Care Do’s Don’ts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवडच्या खूनाचा उलगडा; पत्नीने केला दोघांच्या मदतीने पतीचा खून

Next Post

उद्धव ठाकरेंना झटका! माजी आमदारासह मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
IMG 3

उद्धव ठाकरेंना झटका! माजी आमदारासह मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011