सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चीन, पाकिस्तानमध्ये गेलेल्यांची संपत्ती आहे १ लाख कोटींची; केंद्र सरकार करणार लिलाव, बघा, कोणत्या आहेत या मालमत्ता?

मार्च 21, 2023 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
Narendra Modi e1666893701426

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातून आपली मालमत्ता, विशेषतः वास्तू सोडून पाकिस्तान किंवा चीनमध्ये स्थायिक झालेल्यांची संख्या बरीच आहे. या मालमत्तेचे अधिकार भारत सरकारकडे असून त्यांचा लिलाव करण्याचेही अधिकार सरकारलाच आहे. अश्या मालमत्तेला शत्रू मालमत्ता म्हणतात आणि सध्या भारतात १ लाख कोटी किंमतीची शत्रू मालमत्ता अस्तित्वात आहे. भारतात १२ हजार ६११ शत्रू मालमत्ता असून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी यासंदर्भातली प्रक्रिया सुरू केली होती. यामधे आजतागायत भारत सोडून पाकिस्तान किंवा चीनमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मालमत्तांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आजघडीला तब्बल १२ हजार ६११ शत्रू मालमत्ता आहेत. याची अंदाजे किंमत १ लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. या मालमत्ता सध्या कस्टोडियन एनेमी प्रॉपर्टी ऑफ इंडियाच्या (CEPI) ताब्यात आहेत.

केंद्र सरकारने यासंदर्भातल्या नियमावलीमध्ये बदल केले असून अशा मालमत्तांच्या विक्रीसाठी जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपायुक्तांच्या संमतीने प्रक्रिया सुरू करता येणार आहे. मालमत्तेचं मूल्य १ कोटींपेक्षा कमी असेल, तर त्या मालमत्तेची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला खरेदीसाठी प्राधान्य दिले जाईल. त्यांनी खरेदीसाठी असमर्थता दर्शवली, तर नियमित प्रक्रियेनुसार खुल्या बाजारात मालमत्तेची विक्री केली जाईल.

एखादी मालमत्ता एक कोटींपेक्षा जास्त आणि १०० कोटींपेक्षा कमी असेल, तर त्याचा लिलाव एनेमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया किवा केंद्र सरकारमार्फत केली जाणार आहे. आत्तापर्यंत केंद्र सरकारने अशा प्रकारच्या मालमत्तांच्या लिलावातून ३ हजार ४०० कोटींची कमाई केली आहे.

उत्तर प्रदेश आघाडीवर
शत्रू मालमत्तेची संख्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. या राज्यात ६ हजार २५५ शत्रू मालमत्ता असून त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ४ हजार ८८, दिल्ली येथे ६५९, गोव्यामध्ये २९५, महाराष्ट्रात २०८ शत्रू मालमत्ता आहेत. महाराष्ट्रानंतर तेलंगणा (१५८), गुजरात (१५१), त्रिपुरा (१०५), बिहार (९४), मध्यप्रदेश (९४), छत्तीसगड (७८) आणि हरियाणाचा (७१) क्रमांक लागतो.

पहिला अध्यादेश १९५९ मध्ये
भारत सरकारने १० सप्टेंबर १९५९ रोजी पहिला अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर १८ डिसेंबर १९७१ रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला. शत्रू देशात राहणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता किंवा संपत्ती म्हणजे शत्रू मालमत्ता, या अर्थाने या सर्व मालमत्तांचा केंद्र सरकारकडून लिलाव करण्यात येतो.

Enemy Property Modi Government Auction Sale

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रेकअप आणि प्रेमाबद्दल प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच केलं हे भाष्य

Next Post

अहमदनगरचे दोघे लाचखोर लेखापरीक्षक जाळ्यात मागितले ३ लाख… अखेर ज्युस सेंटरवर १ लाख घेताना रंगेहाथ पकडले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
Corruption Bribe Lach ACB

अहमदनगरचे दोघे लाचखोर लेखापरीक्षक जाळ्यात मागितले ३ लाख... अखेर ज्युस सेंटरवर १ लाख घेताना रंगेहाथ पकडले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011