India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला…. आता याच व्यक्तीकडे आहे भाजपची मध्य प्रदेशची जबाबदारी…

India Darpan by India Darpan
May 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक विधानसभा निवडणुकी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवित भाजपची धुळधाण केली. हा विजय मिळवून दक्षिणेकडील राज्यात या पक्षाने पुनरागमन केले आहे. काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय राहुल गांधींपासून, मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक कॉग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना जाते. मात्र या विजयात पडद्यामागचा खरा हिरो आहे सुनील कानुगोलू आहे. विशेष म्हणजे, सुनील यांच्याकडे भाजपने आता मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. आणि तेथे लवकरच निवडणूक होणार आहे.

प्रमुख रणनीतीकार
कन्याकुमारी पासून काश्मिरपर्यंत काढलेल्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचे श्रेय देखील सुनील कानुगोलूलाच जाते. सुनील कानुगोलू हे काँग्रेसचा कर्नाटक निवडणूकीतील प्रमुख रणनीतीकार होते. संपूर्ण निवडणुकीदरम्यान, त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्याने जनतेशी संपर्क बनवून ठेवला. तसेच भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारची पोलखोल केली. सुनील कानुगोलू प्रचारासाठी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आणि जनतेची नस ओळखून काँग्रेसला कर्नाटकमध्ये विजय मिळवून दिला.

प्रशांत किशोरसोबत काम
विशेष म्हणजे सुनील कानुगोलूने प्रशांत किशोरसोबत देखील काम केले आहे. मॅकिन्सचे माजी सल्लागार सुनील कानुगोलू २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते. तसेच त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंडसचे प्रमुख म्हणून काम केले आहे. सुनील कानुगोलूनेचे नेतृत्व केले आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली.  या सर्व निवडणूकांमध्ये भाजप जिंकला किंवा निवडणूकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

टास्क फोर्स मध्येही
सध्या देशाच्या राज्यस्तरीय राजकारणाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली असून भाजपचा सफाया केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचे श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक वाटकेरी आहेत. ज्यांच्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत पुन्हा पाय रोवत आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसनं सुनील कानुगोलू यांना निवडणूक रणनितीकार म्हणून पक्षात स्थान दिलं होते. काँग्रेसने गेल्या वर्षी मे महिन्यात २०२४ साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

विविध पक्षांची जबाबदारी
सुनील कानुगोलू यांनी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपसोबतही काम केले आहे. त्यामुळे अनेक निवडणुकांमध्ये भाजप जिंकला किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मूळचे कर्नाटकचे असूनही सुनील हे चेन्नईत लहानाचे मोठे झाले. साधीभोळी व्यक्तिरेखा असूनही सुनील राजकीय क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि रणनिती आखण्यास सुरुवात केली.

या पुढील जबाबदारी
विशेषतः राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचे श्रेयही त्यांनाच जाते. विशेष म्हणजे, कर्नाटकातील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसोबत काम केले होते. त्यावेळीही सुनील यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता. तेलंगणातही काँग्रेसची सत्ता आणून देण्याचं काम सुनील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. त्याची जबाबदारीही सुनील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपने सुनील यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. येत्या काही महिन्यातच तेथे निवडणूक होणार आहे.

Election Campaign Manager Sunil Kanugolu Success Story


Previous Post

आरोग्य विभागाचे पथक जाणार या तीन राज्यात… बिगर भाजप सरकारची यंत्रणा पाहणार… आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय

Next Post

मुंबईतील २७ हजार महिलांना मिळणार विविध मशिन आणि यंत्र सामग्री… महापालिकेची योजना

Next Post

मुंबईतील २७ हजार महिलांना मिळणार विविध मशिन आणि यंत्र सामग्री... महापालिकेची योजना

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group