इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्यासंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. शनिवारी या सुनावणीचे पत्र काँग्रेसला पाठवण्यात आले आहे. काँग्रेसने निवडणुकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत केले त्यानंतर आयोगाने ही सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याअगोदर काँग्रेसच्या CWC च्या बैठकीत केवळ ईव्हीएमवरच नव्हे तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी नाना पटोले, रमेश चेन्निथला आणि मुकुल वासनिक यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबत पत्र लिहिले. आम्ही आमचे काम करत आहोत, पण निवडणूक आयोगानेही आपले कर्तव्य बजावले पाहिजे असे काँग्रेसने म्हटले होते. त्यानंतर ही सुनावणी आता होणार आहे.
काँग्रेसबरोबरच शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनेक प्रश्न विधानसभा निवडणुकी संदर्भात उपस्थितीत केले आहे. पण, काँग्रेसने पत्र दिल्यामुळे ही सुनावणी होणार आहे.