बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी शाळेच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण…

फेब्रुवारी 14, 2025 | 8:10 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250214 WA0334 1

नाशिक (इंडिया दर्प वृत्तसेवा): विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. दुर्गम भागात हिवाळी शाळेच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक शिक्षण प्राप्त होत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब असून हिवाळी शाळा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी शाळेच्या नूतन इमारत (wonder world z.p. School) लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कानोज, सरपंच माया बागुल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, हिवाळी शाळेचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हिवाळी शाळेतील मुलांची गुणवत्ता ही अभूतपूर्व आहे. मुलांनी क्षणात मोठ्या संख्येचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार प्रकिया करून दाखविली. 1330 पर्यंत पाढे म्हणून दाखविले. भारतीय राज्यघटनेचे कलम सांगितले. येथील मुलांनी साकारलेली परसबाग, गायीचा गोठा इत्यादी गोष्टी पाहून मी थक्क झालो. आजच्या स्पर्धात्मक युगात या शाळेचे नाव देशपातळीवर अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या बौद्धिक पातळीनुसार त्यांना शिक्षण देणारा हा शिक्षक हे एक अवलिया व जादुगार आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिक्षक केशव गावित यांचे कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, शिक्षक केशव गावित यांच्या जिल्हा परिषद शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आदर्श इतर शिक्षकांनीही घ्यावा. हिवाळी शाळेसाठी आवश्यक सेवा-सुविधांची तरतूद शासनस्तरावर केली जाईल. हिवाळी शाळेस पुन्हा भेट देणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक केशव गावित व त्यांचे शिक्षक सहकारी अतिशय समर्पित भावनेने वर्षाचे 365 दिवस मुलांना ज्ञानार्जन करीत आहेत. महाराष्ट्रातून असे उपक्रमशील शिक्षक शोधून हिवाळी शाळेचा उपक्रम येणाऱ्या काळात राज्यभरात राबविला जाणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी पारंपरिक नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम हिवाळी जुनी शाळा व मुलांनी तयार केलेल्या परसबागेची भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हिवाळी शाळेच्या नवीन इमारतीला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुलांनी त्यांनी आत्मसात केलेली शैक्षणिक कौशल्ये मान्यवरांसमोर सादर केली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षक केशव गावित यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यांना शाळेसाठी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले. शाळेसाठी स्वतःची एक एकर जमीन देणारे शेतकरी हरिदास भुसारे यांचाही स्मृतिचिन्ह देवून यावेळी सत्कार झाला व त्यांनाही रुपये पाच लाख अर्थसहाय्य देण्यात आले. यानंतर गीव्ह फाउंडेशनचे रमेश अय्यर, विनीत व वीणा मालगावकर, आर्किटेक पूजा खैरनार, महेंद्र भोये, प्रमोद भोये यांचा सत्कार करण्यात आला.

हिवाळी शाळेची माहिती
हिवाळी गावातील शेतकरी हरिदास भुसारे यांनी स्वतःची दीड एकर जमिनीतून एक एकर जमीन शाळेच्या नवीन इमारतीसाठी दान दिली आहे.व आर्मस्टाँग कंपनी व माजगावकर बंधू यांच्या मदतीने शाळेस नवी इमारत मिळाली आहे.

हिवाळी येथील ही शाळा वर्ष 2016 पासून दररोज तेरा तास वर्षाचे 365 दिवस भरते. शाळेची पटसंख्या 27 आहे. शाळेत शालेय शिक्षणासह विविध व्यावसायिक व बौद्धिक क्षमता वाढीचे उपक्रम शिकविले जातात. त्यामुळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने शाळेत येवून येथेच 12 तासापेक्षा अधिक वेळ येथे रमतात. शाळेतील विद्यार्थी दोन्ही हातांनी एकावेळी वेगाने लिहू शकतात. तीन अंकी संख्यांचे व हजारापर्यंत पाढे विद्यार्थी म्हणतात. मराठीसह इंग्रजी भाषेतही विद्यार्थी संवाद साधतात. विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे कलम तोंडपाठ आहेत. शाळेतील वर्गखोल्या शैक्षणिक साहित्याची सुबकपणे केलेल्या मांडणीतून सजलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शालेय शिक्षण साहित्याची सांगड घातलेली विद्यार्थ्यांची कल्पकता येथे पहावयास मिळते. नैसर्गिक अडथळ्यांमुळे इंटरनेट सुविधा हिवाळी शाळेत पोहचू शकत नाहीत, त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अनुभवाचा वापर करण्यावर मर्यादा येतात तरीही उपलब्ध साहित्यातून तंत्रज्ञानाच्या बरोबरीने विद्यार्थी येथे अध्ययन अनुभव घेतात. या शाळेतील मुले आय ए एस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. विद्यार्थांना आनंददायी शिक्षण हिवाळी शाळेचे शिक्षक केशव गावित यांनी मुलांना उपलब्ध करून दिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात कुलगुरु यांचा विद्यार्थ्यांशी संवाद…

Next Post

आता सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार योजना…नामांकनासाठी ही आहे अंतिम तारीख

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
modi 111

आता सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार योजना…नामांकनासाठी ही आहे अंतिम तारीख

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011