इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा येथील मूळ गावी दरे येथे गेलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री ताप आला आहे. आज ते दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. दरम्यान डॅाक्टरांची एक टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आली आहे. मुख्यमंत्र्यांना डॅाक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर कोणतीच विश्रांती मुख्यमंत्र्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. त्यातच हवामानातही बदल झाला आहे. त्यामुळे त्यांना अगोदर कणकण भासू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला.
दरम्यान शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे गावी गेले. पण, मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना बंगल्याच्या गेटवरुनच माघारी फिरावे लागले.