मुंबई इंडिया (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले, तर त्याचवेळी बऱ्याच कंपन्या मालामालही झाल्या. अत्यंत वाईट परिस्थितीतही पैसा कमावण्याचे माध्यम काही कंपन्यांनी शोधले. आश्चर्य म्हणजे त्या काळात मालामाल झालेल्या कंपनीचे आता दिवाळे निघाले आहे.
कोरोना काळात औषध कंपन्या तसेच आरोग्याशी निगडीत उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जोरदार कमाई केली. त्याचवेळी अॉनलाईन एज्युकेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याही फार्मात होत्या. त्यातील एक आघाडीचे नाव म्हणजे बायजू अर्थात भारतीय एडटेक कंपनी. ही कंपनी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. शाहरुख खान ज्या कंपनीचा ब्रांड एम्बेसिडर होता, त्या कंपनीवर आता ही वेळ यावी, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या कंपनीने ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १.२ बिलियन डॉलरचे संपूर्ण आवर्ती कर्ज फेडण्याची ऑफर दिली आहे, भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम ९९४७ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे एडटेक कंपनी बायजू गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटातून जात आहे.
गेल्या वर्षी जेव्हा सप्टेंबर २०२२ मध्ये आर्थिक आकडेवारी जाहीर झाली, तेव्हा कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. २०२१ च्या आर्थिक वर्षात बायजूचे ४५८९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या डेटावरून समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याचे उत्पन्नही ३० टक्क्यांनी घसरून २४२८ कोटी रुपयांवर आले आहे. याशिवाय बायजूला कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अकाउंटिंगमधील अनियमितता आणि मोठ्या प्रमाणात टाळेबंदी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नाही तर बायजूने कर्ज देणाऱ्या टीएलबीला १.२ बिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यासही नकार दिला आहे.
कंपनीची ऑफर
दुरुस्तीचा प्रस्ताव स्वीकारल्यास कंपनी ३०० दशलक्ष डॉलर संकटग्रस्त कर्जाची परतफेड ३ महिन्यांत करण्याची आणि उर्वरित रक्कम पुढील ३ महिन्यांत परत करण्याची ऑफर देत आहे. कर्जदार प्रस्तावाचे पुनरावलोकन करीत आहेत आणि परतफेड कशी केली जाईल, याबद्दल अधिक माहिती घेतली जात आहे.
Edutech Company Byjus Bankruptcy Creditors Pay
Financial