इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोलकाता येथील एका व्यावसायिकाच्या घरात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मोठेच घबाड गवसले. जप्त झालेल्या रोख रकमेची मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १८ मोजणी यंत्रे आणावी लागली. सुमारे १६ तास नोटांच्या मोजणीसाठी लागले. ईडीने व्यावसायिक आमिर खानच्या गार्डन रीच निवासस्थानातून १७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली. केंद्रीय तपास यंत्रणेला या बंगल्यात १० तिजोऱ्याही सापडल्या आहेत. मात्र, हा साठा केवळ पाच तिजोऱ्यांमधीलच आहे. आन्य तिजोऱ्या खोलणे बाकी आहे. शनिवारी सकाळी तपास यंत्रणेने शोध सुरू केला आणि रात्री उशिरापर्यंत रोख मोजणी सुरू होती. ईडीच्या शोध पथकात बँक अधिकारी आणि केंद्रीय दला समावेश होता. छाप्यात ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधिक सापडल्या आहेत. तर, २ हजार आणि २०० रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) २००२ च्या तरतुदींनुसार छापा टाकण्यात आला होता. मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात फेडरल बँकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. त्याआधारे गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये आमिर खान आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. ईडीने सांगितले की, आमिर खानने ई-नगेट्स नावाचे मोबाइल गेमिंग अॅप्लिकेशन लॉन्च केले, जे लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने डिझाइन केले गेले आहे. या अॅपद्वारे प्रथम वापरकर्त्यांना कमिशनसह बक्षीस देखील देण्यात आले. वापरकर्ते वॉलेटची रक्कम सहज काढू शकतात. त्यामुळे अॅपची विश्वासार्हता वाढली. जास्त कमिशनच्या लालसेपोटी मोठ्या प्रमाणात ग्राहक गुंतवणूक करू लागले. लोकांकडून लक्षणीय रक्कम जमा केल्यानंतर अचानक अॅपवरून पैसे काढणे बंद करण्यात आले. सिस्टिम अपग्रेड होत असल्याचे ग्राहकांना सांगण्यात आले. प्रोफाईल माहितीसह सर्व डेटा नंतर अॅप सर्व्हरवरून काढून टाकण्यात आला. त्यानंतर लोकांना लक्षात आले की आपली मोठीच फसवणूक झाली आहे.
https://twitter.com/pallavict/status/1568594951579271169?s=20&t=1OxEW10twHT5vcpFYGCDUw
ॲपआधारित मोबाइल गेम्स सेवा देण्याचा दावा करणाऱ्या व्यावसायिकाच्या बंगल्यामध्ये कॉटच्या खाली १२ कोटींची रोकड दडविल्याचे आढळून आले. ही सर्व बेहिशेबी रक्कम असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ती जप्त केली आहे. विशेष म्हणजे याच व्यावसायिकाच्या अन्य सहा मालमत्तांवरही आता छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी आमिर खानला अटक करण्यात आली आहे.
ई-नगेटस् कंपनीचा संचालक आमीर खानने ॲपच्या माध्यमातून मोबाइल गेम्स सेवा सुरु केली होती. यात एक पेमेंट वॉलेट तयार केले होते. यात पैसे भरून लोकांना गेम्स खेळता येत असत. गेम खेळायचा नसेल आणि त्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक असतील तर ते पैसे पुन्हा काढून घेता येत असत. गेम जिंकणाऱ्या लोकांना बक्षिसापोटी पैसे देण्यात यायचे.
गेम अन्य ग्राहकांना पोहोचविल्याबद्दल त्या ग्राहकाला कमिशन दिले जाई. वर्षभर हे व्यवस्थित सुरू होते. लाखो लोकांनी मोठ्या रकमा या ॲपच्या पेमेंट वॉलेटमध्ये भरल्या. गेल्या वर्षभरापासून या ॲपच्या वॉलेटमधून शिल्लक रक्कम काढून घेणे ग्राहकांना शक्य होत नव्हते. कंपनीकडून ॲपचा मेंटेनन्स सुरू आहे, वगैरे अनेक कारणे दिली जात होती. कंपनीच्या मालकाने १२ कोटींची रोकड पलंगामध्ये दडवून ठेवली होती. याप्रकरणी आता अधिक पोलीस तपास सुरू आहे. आमीरच्या अन्य मालमत्तांवरही छापेमारी सुरू आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1568530998845145088?s=20&t=1OxEW10twHT5vcpFYGCDUw
एका अहवालानुसार देशभरात २०२२ मध्ये गेमिंग वापरकर्त्यांची संख्या ५०० दशलक्ष पार होती. त्यामुळे गेमिंग हा मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठा विभाग बनला आहे. हे भारतीय ग्राहकांसाठी मनोरंजनाचे सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे आणि बाजारपेठेत अधिक वेगाने वाढेल. वापरकर्ते आगामी काळात त्यावर प्रचंड पैसा खर्च करतील अशी अपेक्षा आहे. टचिंग अ बिलियन इंडियन्स’ या अहवालानुसार, भारतीय ग्राहक ऑनलाइन गेमिंगसाठी सरासरी ४ तास घालवतात.
या संदर्भात एक मुख्य विपणन अधिकारी, म्हणाले, “भारतात गेमिंगची लोकप्रियता वाढत आहे, ९५ टक्के गेमिंग प्रेमी त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर विविध आणि सर्व प्रकारच्या सामग्रीचा आनंद घेतात. स्मार्टफोन आणि 4G च्या वाढत्या प्रवेशामुळे गेमिंग सामग्री मनोरंजनासाठी तो एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. हे लक्षात घेऊन अनेक कंपन्या गेमिंगमध्ये डिजिटल कंटेंट स्ट्रॅटेजीवर भर देत आहे. त्यातून गैरप्रकार घडणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे
ED Raid in Kolkata Mobile Game Businessman Lots of Money Found