India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

१० राज्यांत २७ बायका! लखोबा लोखंडेचे कारनामे पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावले… अखेर अटक…

India Darpan by India Darpan
April 7, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्राची कॉपी वाटतील असे काही कलंदर गुन्हेगार आजही आपल्या आसपास असतात. असाच एक लखोबा ईडीने ताब्यात घेतला आहे. दहा राज्यांमध्ये २७ बायका करणारा हा नवरा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

रमेश स्वॅन अर्थात बिभू प्रकाश स्वॅन असे त्याचे नाव असून त्याला मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ईडीने त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली तेव्हा त्याच्यातील लखोबा उघडकीस आला. त्याने दहा राज्यांमध्ये तब्बल २७ महिलांसोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्यांची फसवणूक करून फरार झाला. ज्या बायकांसोबत त्याने लग्न केली, त्या सर्व महिला डॉक्टर, सीए यासारख्या मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या होत्या, हे विशेष.

आयटीबीपीची एक सहायक कमांडंट, आसाममधील डॉक्टर, छत्तीसगडची चार्टर्ड अकाउंटेंट, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाची वकील, केरळच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्या महिलांचा यात समावेश आहे. त्याला 2011मध्ये हैदराबाद येथे अटक करण्यात आली होती. तुमच्या मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो असं सांगून काही पालकांकडून एकूण 2 कोटी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर त्याने 2006मध्ये केरळच्या 13 बॅकांना 128 बनावट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक कोटीची फसवणूक केली होती. या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.

आर्थिक खात्यांची चौकशी
पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात स्वॅनची पत्नी डॉ. कमला सेठी, तिची सावत्र बहीण आणि डॉक्टरांना अटक केली होती. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका केली. स्वॅन 66 वर्षांचा आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी ओडिशा पोलीस ईडीच्या संपर्कात आहे. त्याच्या सर्व फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. त्याच्या खात्यांची चौकशी करून आर्थिक देवाणघेवाणीची माहिती घेतली जात आहे. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी रिमांड मागितली आहे.

ED Arrest Ramesh Swan 10 States 27 Wife Money Laundering


Previous Post

ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी

Next Post

नोकरी करणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी सुवर्णसंधी; वसतीगृहात मिळेल मोफत प्रवेश

Next Post

नोकरी करणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी सुवर्णसंधी; वसतीगृहात मिळेल मोफत प्रवेश

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group