नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नागपूर आणि मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने तब्बल १५ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
नागपूर पोलिसांनी दाकल केलेल्या प्राथमिक अहवालाच्या (एफआयआर) आधारे ईडीने पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहदिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक आणि कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुंतवणुकीच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात हे छापे टाकले. नागपुरातील काही लोकांच्या घरातून १.२१ कोटी रुपये रोख आणि ५ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ मार्चपासून नागपूर आणि मुंबईत १५ ठिकाणी शोध सुरू करण्यात आला होता. छाप्यांमध्ये अनेक डिजिटल उपकरणे आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
नागपूर पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे, ईडीने पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहदिया यांच्याविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक आणि कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
https://twitter.com/dir_ed/status/1632693964494045185?s=20
ED 15 Places Raid Seized 1 Crore Cash 5 Crore Jewellery