मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. फडणवीस यांनी सरकारी वकीलांशी फोनवर संपर्क साधून जी माहिती मिळाली ती सभागृहाला सादर केली. बघा, त्यांनी काय सांगितले याचा हा व्हिडिओ
तातडी नाही,असे सांगत ५ आठवडे ‘जैसे थे‘चे आदेश.राज्य सरकारच्या वकिलांनी माहिती विचारली तेव्हा,सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती नाही.
अर्थात ही दूरध्वनीवर प्राप्त प्राथमिक माहिती आहे.
न्यायालयाचा लिखित आदेश आला की अधिक स्पष्टता येईल!#VidhanSabha pic.twitter.com/RTCvH06bPV— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) August 22, 2022
DYCM Devendra Fadanvis on OBC Reservation SC Hearing
Monsoon Assembly Session